बृहत् पोलंडचा उठाव (१८०६)
इ.स. १८०६चा बृहत् पोलंडचा उठाव (नामभेद: इ.स. १८०६चा मोठ्या पोलंडचा उठाव) हा पोलिश लोकांनी "विएल्कोपोलस्का" (बृहत् पोलंड ऊर्फ मोठे पोलंड) मध्ये प्रशियाने पोलंडचे काही भाग गिळंकृत केल्यावर केलेला लष्करी उठाव होता. फ्रान्सने या युद्धात पोलंडच्या लोकांना समर्थन दिले. या उठावामध्ये पोलंडचे लोक विजयी झाले.