बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम

मुंबईत वीजपुरवठा व बस सेवा पुरवण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
(बी.ई.एस.टी. या पानावरून पुनर्निर्देशित)
Brihanmumbai Electric Supply and Transport (es); Brihanmumbai Electric Supply and Transport (fr); ബൃഹന്മുംബൈ ഇലക്ട്രിക് സപ്ലൈ ആൻഡ് ട്രാൻസ്പോർട്ട് (ml); Brihanmumbai Electric Supply and Transport (nl); बृहन्मुम्बै विद्युतापूर्तिः एवं परिवहनसंस्था(बेस्ट्) (sa); बृहन्मुंबई विद्युत आपूर्ति एवं यातायात (hi); ಬಿ. ಇ. ಎಸ್. ಟಿ, ಮುಂಬೈ (kn); Brihanmumbai Electric Supply and Transport (en); Brihanmumbai Electric Supply and Transport (de); Brihanmumbai電力供應及交通 (zh); बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (mr) public sector undertaking to supply power and run bus services in Mumbai (en); मुंबईत वीजपुरवठा व बस सेवा पुरवण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (mr); Unternehmen in Indien (de) बेस्ट (sa); बेस्ट (mr); BEST (en); 大孟买电力供应及运输公司 (zh); बेस्ट (hi)

बेस्ट ही (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) (English:Brihanmumbai Electricity Supply and Transport, (BEST)) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. बेस्टचा जन्म इ.स. १८७३ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्ट ने वाडी बंदर येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली. १९२६ पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. आणि आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम 
मुंबईत वीजपुरवठा व बस सेवा पुरवण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
'इलेक्ट्रिक हाउस' हे बेस्टचे मुख्यालय आहे
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसार्वजनिक उपक्रम
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १८७३
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट".

इतिहास

संपादन

बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये "बॉम्बे ट्रामवे १८७४" नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणाऱ्या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली.

बेस्टची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. असत कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला.

सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या.

पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली.

दुसऱ्या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट"च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले.

परिवहन

संपादन

२०१३ च्या आकडेवारीप्रमाणे बेस्टकडे ४६८० बस आणि ३६५ वाहतूक मार्ग आहेत आणि त्यातून त्या वर्षी ५० लाख लोकांनी प्रवास केला.

बेस्टच्या बससेवांचे प्रकार :

१. साधारण बस - बस क्रमांक पांढऱ्या रंगात आणि बाकीचा भाग काळ्या रंगात असा फलक असतो. या बस आपल्या मार्गातल्या सर्व स्थानकांवर थांबतात.

२. मर्यादित बस - बस क्रमांक लाल रंगाचा असतो. या बस आपल्या मार्गातल्या प्रमुख स्थानकांवरच थांबतात.

३. एक्सप्रेस बस - बस क्रमांक लाल रंगात आणि बाकीचा भाग पिवळ्या रंगात असा फलक असतो. या बस आपल्या मार्गातल्या मोजक्याच स्थानकांवर थांबतात. या गाड्या मुख्यतः लांब पल्ल्याच्या असतात. या गाड्या सगळ्या उड्डाणपुलांवरून जातात.

४. वातानुकूलित बस - काही लांब पल्ल्याच्या मार्गांवर वातानुकूलित बस धावतात.

५. फेरी सेवा - बेस्टची मुंबईच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावर वरसोवा, मनोरी, मड, मार्वे येथे जलमार्गाने जाणारी फेरी सेवा आहे.

बेस्टला मिळालेले पुरस्कार

संपादन
  1. नागरी परिवहन मंडळाकडून दुसरे पारितोषिक १९८२
  2. नागरी परिवहन उत्पादन दुसरे पारितोषिक १९८४
  3. नागरी परिवहन उत्तम कामगिरी पहिले पारितोषिक १९८६-८७
  4. राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार १९९१-९२
  5. प्रवासी सुरक्षितता पुरस्कार १९९४
  6. आंतरराष्ट्रीय रस्ता सुरक्षितता पुरस्कार २००३

चित्र

संपादन

बाह्य दुवे

संपादन