बिठूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक नगर आहे. कानपूर शहराच्या २५ किमी वायव्येस गंगा नदीच्या पश्चिम काठावर वसलेले बिठूर एक ऐतिहासिक स्थान असून श्रीरामामांच्या लव आणि कुश ह्या पुत्रांचा जन्म येथेच झाला होता असे मानले जाते.

बिठूर
उत्तर प्रदेशमधील शहर

1167 main-ghat-at-bithoor.jpg
बिठूर येथील गंगा नदीवरील ब्रह्मावर्त घाट
बिठूर is located in उत्तर प्रदेश
बिठूर
बिठूर
बिठूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान
बिठूर is located in भारत
बिठूर
बिठूर
बिठूरचे भारतमधील स्थान

गुणक: 26°36′36″N 80°16′19″E / 26.61000°N 80.27194°E / 26.61000; 80.27194

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा कानपूर नगर जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ११,३००
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


येथील नानसाहेब पेशवा स्मारक

१८१७ साली घडलेल्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पेशव्यांचा सपशेल पराभव झाला ज्याबरोबरच मराठा साम्राज्याचा अस्त झाला. तत्कालीन पेशवा दुसरा बाजीराव ह्यास इंग्रजांनी हाकलून लावले ज्यानंतर तो बिठूर येथे स्थायिक झाला. १८५१ साली बिठूरमधेच त्याचे निधन झाले. दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेबाने उत्तर भारतातील इतर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई इत्यादींसोबत हातमिळवणी करून इंग्रजांविरुद्ध लढा चालू ठेवला होता. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान नानासाहेबाने येथूनच कानपूराला वेढा देऊन सुमारे ३०० ब्रिटिश सैनिकांची हत्त्या केली होती. ह्याचा बदला म्हणून ब्रिटिश राजवटीने बिठूर गाव जमीनदोस्त करून येथील अनेक मंदिरे व पेशव्यांचा राजवाडा पाडून टाकला.