बाल्कन युद्धे
बाल्कन युद्धे युरोपाच्या बाल्कन द्वीपकल्पावर ऑक्टोबर १९१२ ते जुलै १९१३ दरम्यान लढली गेली. पहिल्या बाल्कन युद्धात मॉंटेनिग्रो, सर्बिया, ग्रीस व बल्गेरिया ह्या राष्ट्रांनी एकत्र येऊन ओस्मानी साम्राज्याचा पराभव केला तर दुसऱ्या बाल्कन युद्धात मॉंटेनिग्रो, सर्बिया, ग्रीस व रोमेनिया देशांनी बल्गेरियाचा पराभव केला. ओस्मानी साम्राज्याने बाल्कन युद्धांमध्ये आपला युरोपामधील सर्व भूभाग गमावला. ऑस्ट्रिया-हंगेरी ह्या युद्धांमध्ये थेट समाविष्ट झाले नसले तरी सर्बियाच्या वाढत्या सामर्थ्यापुढे त्याची ताकद कमी झाली. बाल्कन युद्धांमुळे ऑस्ट्रिया-हंगेरी व बाल्कन राष्ट्रांदरम्यानच्या वाढलेल्या तणावाची परिणती १९१४ सालच्या सारायेव्हो येथील ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडच्या हत्येत झाली व पहिल्या महायुद्धास सुरुवात झाली.
परिणाम
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बाल्कन युद्धाचे परिणाम दूरगामी स्वरूपाचे झाले. जीर्ण झालेल्या तुर्की साम्राज्याचा डोलारा या बाल्कन युद्धामुळे ढासळला. तुर्कस्थानला बराच प्रदेश गमवावा लागला. बाल्कन परिसरात ग्रीस , सर्बिया , मोन्टेनिग्रो ही स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली. बल्गेरिया आणि रुमानिया यांच्या प्रदेशात वाढ झाली परंतु बाल्कन राष्ट्रांचा हव्यास अधिक वाढला. बल्गेरिया ' विशाल साम्राज्य ' उभारण्याचे स्वप्न पाहू लागले. दुसऱ्या बाल्कन युद्धामुळे बल्गेरीयाच्या महत्त्वाकांक्षेचा फुगा फुटला. सर्बियाला मात्र विस्तार करण्यास संधी मिळाली. तथापि अल्बानियाच्या निर्मितीमुळे सर्बिया असंतुष्टच राहिला.
दुसऱ्या बाल्कन युद्धामुळे ग्रीसचा भरपूर फायदा झाला. तरीही त्राव्न्सिल्व्हानिया आणि बेसाराबिया या प्रदेशावर आपले हक्क मान्य व्हावेत असे ग्रीसला वाटत होते. बाल्कन युद्धाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे अल्बानिया या राष्ट्राची निर्मिती Ị विल्यम ऑफ विड हा जर्मन राजपुत्र अल्बानियाचा राजा झाला. अल्बानिया राज्य पहिल्या महायुद्धाच्या तडाखाने लवकरच कोसळले. अल्बानियाच्या निर्मितीला ऑस्ट्रीयाच कारणीभूत असल्यामुळे सर्बिया व ऑस्ट्रीया यांचे वैर अधिकच घट्ट झाले. सर्बियाचे सामर्थ्य बाल्कन युद्धामुळे वाढल्यामुळे या राष्ट्राच्या नेतृत्वाखाली चाललेल्या युगोस्लाव्ह चळवळीला अधिकच उतेजन मिळाले. युरोपीय राष्ट्रे प्रत्यक्ष बाल्कन युद्धापासून अलिप्त जरी राहिलेली असली तरी अप्रत्यक्ष प्रभाव गाजवण्याचे धोरण त्यांनी सोडले नाही. त्यामुळे रशियाविषयी बल्गेरियाला चीड आली तर ऑस्ट्रीयाविषयी सर्बियाला कटुता वाटू लागली. परिणामी युरोपात चाललेल्या गटबाजीच्या राजकारणात बाल्कन राष्ट्रेही खेचली गेली.
सर्बिया आणि ऑस्ट्रीया यांच्यातील वैमनस्य केवळ एका वर्षात पराकोटीचे वाढले. आजारी तुर्कस्थानने बाल्कन राष्ट्रांचे आणि युरोपातील बड्या राष्ट्रांचे आरोग्य बिघडवले. म्हणून पहिल्या महायुद्धाचे बरेच श्रेय पूर्वेकडील प्रश्नांना दिले जाते.