बालचंद्र अखिल
एक अखिल भारतीय क्रिकेट खेळाडू
बालचंद्र अखिल ( ७ ऑक्टोबर १९७७ , बंगलोर, कर्नाटक) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो कर्नाटकच्या वतीने खेळतो. तो उजव्या हाताने खेळणारा मधल्या फळीतील फलंदाज असून तो मध्यम-जलदगतीचा गोलंदाजही आहे. सन १९९५ मध्ये, १९ वर्षांखालील संघात, कूच बिहार करंडकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचा समावेश होता. नंतर सन १९९८ मध्ये तो वरिष्ठ संघाचा सदस्य झाला. इंडियन प्रिमीअर लिगचे सामनेही तो खेळला आहे.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|