बाबू गेनू सैद

(बाबू गेनू या पानावरून पुनर्निर्देशित)

बाबू गेनू सैद (इ.स. १९०९; महाळुंगे पडवळ - डिसेंबर १२, इ.स. १९३०, मुंबई) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला एक स्वातंत्र्यसैनिक होता. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्‍या ट्रकाला रोखण्यासाठी तो रस्त्यावर आडवा पडला. १२ डिसेंबर १९३० ला अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत यात्रेस २० हजाराचा जमाव होता. सोनापूर (मुंबई) स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाह्य दुवेसंपादन करा

  • "हुतात्मा बाबू गेनू सैद".


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.