बाबूराव पेंढारकर
(बाबुराव पेंढारकर या पानावरून पुनर्निर्देशित)
बाबूराव पेंढारकर (अन्य लेखनभेद: बाबुराव पेंढारकर ;) (२२ जून, इ.स. १८९६ ; कोल्हापूर, महाराष्ट्र - ९ नोव्हेंबर, इ.स. १९६७) हे मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२० च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
बाबूराव पेंढारकर | |
---|---|
जन्म |
दामोदर गोपाळ पेंढारकर २२ जून १८९६ कोल्हापूर |
मृत्यू |
०९ नोव्हेंबर १९६७ कोल्हापूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | अयोध्येचा राजा |
वडील | डॉ.गोपाळ पेंढारकर |
आई | राधाबाई गोपाळ पेंढारकर |
पत्नी | कुमिदिनी पेंढारकर |
अपत्ये | त्यागराज,श्रीकांत ,श्रीलेखा, सुरेखा |
बापूराव पेंढारकर याच्याशी गल्लत करू नका.
मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ होते.
बाबूरावांच्या जीवनावर "बाबूराव नावाचे झुंबर-बाबूराव पेंढारकर" हा श्रीकांत पेंढारकरांनी संपादित केलेला ग्रंथ मुंबईच्या मोरया प्रकाशनाने १९९० मध्ये प्रसिद्ध केला आहे.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील बाबूराव पेंढारकर चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |