बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७
बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०१७ दरम्यान श्रीलंका दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी, ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१][२][३] दौऱ्यावरील दुसरा कसोटी सामना हा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना होता.[४] दौऱ्यावर कसोटी मालिकेआधी दोन-दिवसीय आणि एकदिवसीय मालिकेआधी एक-दिवसीय सराव सामना खेळवण्यात आला.[५] कसोटी मालिका, बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान ह्यांच्या सन्मानार्थ जॉय बांगला चषकासाठी खेळवण्यात आली.[६]
बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७ | |||||
श्रीलंका | बांगलादेश | ||||
तारीख | ७ मार्च – ८ एप्रिल २०१७ | ||||
संघनायक | रंगना हेराथ (कसोटी) उपुल तरंगा (ए.दि.) |
मुशफिकुर रहिम (कसोटी) मशरफे मोर्तझा (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | कुशल मेंडीस (२५४) | तमिम इक्बाल (२०७) | |||
सर्वाधिक बळी | रंगना हेराथ (१७) | मेहदी हसन (१०) | |||
मालिकावीर | शकिब अल हसन (बां) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | कुशल मेंडीस (१६०) | तमिम इक्बाल (१३१) | |||
सर्वाधिक बळी | नुवान कुलशेखर (४) सुरंगा लकमल (४) |
तास्किन अहमद (६) मशरफे मोर्तझा (६) मुशफिकुर रहमान (६) | |||
मालिकावीर | कुशल मेंडीस (श्री) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | कुशल परेरा (८१) | सौम्य सरकार (६३) | |||
सर्वाधिक बळी | लसिथ मलिंगा (५) | मुशफिकुर रहमान (४) | |||
मालिकावीर | लसिथ मलिंगा (श्री) |
मालिकेआधी, श्रीलंकेचा कर्णधार ॲंजेलो मॅथ्यूजला हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे वळण्यात आले.[७] त्याच्या ऐवजी रंगना हेराथची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[८] एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी मॅथ्यूज तंदुरुस्त होऊ न शकल्याने उपुल तरंगाकडे दोन्ही मालिकांचे कर्णधारपद सोपविण्यात आले.[९]
बांगलादेशने दुसऱ्या कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळविला आणि कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली,[१०]. हा बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी विजय.[११] हा त्यांचा एकूण नववा आणि परदेशातील चवथा कसोटी विजय.[१२] तीन पैकी दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[१३] टी२० मालिकासुद्धा १-१ अशी बरोबरीत सुटली.[१४]
तिसऱ्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने एकदिवसीय मालिकेनंतर, बांगलादेशचा कर्णधार, मशरफे मोर्तझाला एका सामन्यासाठी निलंबित केले गेले.[१५] त्यामुळे मे २०१७ मधील, २०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिकेच्या बांगलादेशच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.[१५] पहिल्या टी२० मालिकेच्या नाणेफेकी आधी, मशरफेने, मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.[१६]
संघ
संपादनकसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
श्रीलंका[१७] | बांगलादेश[१८] | श्रीलंका[९] | बांगलादेश[१९] | श्रीलंका[२०] | बांगलादेश[२१] |
- बांगलादेशी कर्णधार मुशफिकुर रहिमला केवळ फलंदाज म्हणून खेळण्यास सांगण्यात आले. लिटन दासची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली.[२२] परंतू, दुसऱ्या कसोटीआधी सरावादरम्यान बरगड्यांना खालेल्या फ्रॅक्चरमुळे मुशफिकुर रहिमला शेवटच्या कसोटीमध्ये पुन्हा यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडावी लागली.[२३]
- कुशल परेराला पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले, परंतु तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त होण्याची आशा आहे.[२४]
- मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका सुरू होण्याआधी मेहदी हसनला बांगलादेशच्या एकदिवसीय संघात निवडण्यात आले.[२५]
- पहिल्या एकदिवसीय सामन्यात हात फ्रॅक्चर झाल्याने निरोशन डिक्वेल्लाला उर्वरित मालिकेतून वगळण्यात आले.[२६]
- दिलरुवान परेरा, नुवान कुलशेखर आणि नुवान प्रदीपची श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात निवड करण्यात आली.[२६]
- नुवान परेराची श्रीलंकेच्या टी२० संघात निवड करण्यात आली, आणि त्याचबरोबर तंदुरुस्तीच्या कारणामुळे तो खेळू न शकल्यास त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून संदुन वीराक्कोडीची निवड करण्यात आली.[२०]
सराव सामने
संपादनदोन दिवसीयः बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI
संपादन२-३ मार्च २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI, गोलंदाजी
- प्रत्येकी १२ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
एक दिवसीयः बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI
संपादन २२ मार्च २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
- प्रत्येकी १८ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन७-११ मार्च २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
- तिसऱ्या दिवसी ३ऱ्या सत्रतील खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला.
- लिटन दासला (बां) बाद करून डॅनिएल व्हेट्टोरीचा (न्यू) डावखोऱ्या फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जास्त कसोटी बळी घेण्याचा ३६२ बळींचा विक्रम रंगना हेराथने (श्री) मोडला.[२७]
- श्रीलंकेचा कर्णधार म्हणून पहिले तीन कसोटी सामने जिंकणारा रंगना हेराथ हा पहिलाच खेळाडू.[२७]
२री कसोटी
संपादन१५-१९ मार्च २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: मोसद्देक होसेन (बां).
- हा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना.[२८]
- रंगना हेराथचे १,००० प्रथम श्रेणी बळी पूर्ण, असे करणारा तो श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज.[२९]
- बांगलादेशतर्फे कसोटीमध्ये १०० गडी बाद करणारा मुशफिकुर रहिम हा पहिलाच यष्टिरक्षक.[३०]
- बांगलादेशचा हा श्रीलंकेवरील पहिलाच कसोटी विजय.[११]
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: मेहेदी हसन (बां)
- सर्व प्रकारांमध्ये मिळून १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तमिम इक्बाल हा बांगलादेशचा पहिला फलंदाज.[३१]
- बांगलादेशची श्रीलंकेविरुद्धची ही सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या आणि त्यांचा एकदिवसीय सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करताना पहिलाच विजय.[३२]
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- दोन डावांदरम्यान आलेल्या मुसळधार पावसामुळे सामना अर्धवट सोडून देण्यात आला.
- उपुल तरंगाचा (श्री) २००वा एकदिवसीय सामना.[३३]
- कुशल मेंडीसचे (श्री) पहिले एकदिवसीय शतक.[३३]
- तास्किन अहमदची (बा) पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक.[३३]
- रणगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावरील हा ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[३४]
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
टी२० मालिका
संपादन१ला टी२० सामना
संपादन
२रा टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मेहदी सहन (बां)
- *मशरफे मोर्तझाचा (बां) शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना.[३५]
- लसित मलिंगाची (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० हॅट्ट्रीक.[१४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "बांगलादेशचा श्रीलंका दौरा ७ मार्च पासून" (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशच्या क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक २०१७" (इंग्रजी भाषेत). 2017-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशचा श्रीलंका दौरा फेब्रुवारीमध्ये". BDCricket24.Com (इंग्रजी भाषेत). 2017-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश मार्च मध्ये १००वी कसोटी खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशचे श्रीलंका २०१७ वेळापत्रक जाहीर". श्रीलंका क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका-बांगलादेशच्या कसोटी मालिकेचे जॉय बांगला चषक असे नामकरण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश कसोटीमधून मॅथ्यूज बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचे नेतृत्व हेराथकडे, पुष्पकुमारला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "कुशल परेरा, थिसाराचे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "तमिमच्या ८२ धावांमुळे बांगलादेशचा १००व्या कसोटीमध्ये महत्त्वाचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "सोळा वर्षे, १८ प्रयत्न, एक विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "१००व्या कसोटीत बांगलादेशचा ४ गडी राखून विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय विजयांचा दुष्काळ संपवून श्रीलंकेची मालिकेत बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "शकिब, मुस्तफुजूरमुळे बांगलादेशचा ४५-धावांनी विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "षटकांच्या कमी गतीमुळे मशरफेचे निलंबन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका मालिकेनंतर मशरफे आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गुणरत्ने, डिक्वेल्लाचा कसोटी संघात समावेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत मुस्तफिजूरचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशच्या एकदिवसीय संघात सुंझामुल, शुवागताला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "थिसारा, जयसुर्याची टी२० संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नवोदित मोहम्मद सैफुद्दीनची बांगलादेश टी२० संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मुस्तफिजूरला यष्टीरक्षण सोडण्यास सांगितले". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दुसर्या कसोटीमधून लिटन दास बाहेर, मुशफिकुर यष्टिरक्षणासाठी सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतग्रस्त कुशल परेराला पहिला दोन एकदिवसीय सामन्यांतून वगळण्यात आले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मेहदी हसनची बांगलादेशच्या एकदिवसीय संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "हेयरलाईन फ्रॅक्चरमुळे डिक्वेल्ला मालिकेतून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "हेराथ: डावखोर्या फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जास्त बळी" (इंग्रजी भाषेत). १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश कन्फ्रन्ट फॉर्म, सिलेक्शन कॉल्स फॉर लॅंडमार्क टेस्ट". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हेराथचे १,००० प्रथम श्रेणी बळी पूर्ण". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "२४४: पी सारा ओव्हलवर बचाव केली गेलेली सर्वात लहान धावसंख्या". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "तमिमच्या शतकामुळे बांगलादेशचा ९० धावांनी विजय" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "तमिम्स हायज, ॲंड अ फर्स्ट फॉर बांगलादेश" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "मेंडिसच्या शतकानंतर श्रीलंकेच्या संधीदरम्यान पाऊस आडवा" (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रणगिरी डंबुला मैदानावरील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने" (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मशरफेची निवृत्ती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.