बर्ट सट्क्लिफ ओव्हल
बर्ट सटक्लिफ ओव्हल हे लिंकन, न्यू झीलंड येथील लिंकन विद्यापीठ येथे वसलेलेल क्रिकेट मैदान आहे. ह्या मैदानावर प्रथम श्रेणी सामने आणि महिला व १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन झाले आहे. पूर्वी बीआयएल ओव्हल म्हणून ओळखले गेलेल्या मैदानाचे फेब्रुवारी २००० मध्ये, बर्ट सटक्लिफ ह्या न्यू झीलंडच्या सलामीवीराच्या सन्मानाप्रित्यर्थ मैदानाचे नाव बदलले गेले.[१][२]
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लिंकन, न्यू झीलंड |
गुणक | 43°38′48″S 172°27′46″E / 43.6467°S 172.4628°E |
स्थापना | १९९८ |
प्रचालक | न्यू झीलंड क्रिकेट संघ |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम ए.सा. |
२३ जानेवारी २०१४: केन्या वि. नेदरलँड्स |
अंतिम ए.सा. |
१ फेब्रुवारी २०१४: स्कॉटलंड वि. संयुक्त अरब अमिराती |
यजमान संघ माहिती | |
न्यू झीलंड क्रिकेट अकादमी (१९९८-सद्य) | |
शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१६ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
नोव्हेंबर १९९९ मध्ये मैदानावर पहिला प्रथम श्रेणी सामना शेल कॉन्फरन्समध्ये इंग्लंड अ आणि नॉर्थ आयलंड संघांदरम्यान खेळवला गेला. त्यानंतर २००९ स्टेट चॅंपियनशिपच्या अंतिम सामन्यासहित ह्या मैदानावर अनेक अ संघांचे सामने खेळवले गेले. [३]
मैदानावर महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने नेहमी होतात. महिला क्रिकेट विश्वचषक, २००० दरम्यान उपांत्य आणि अंतिम हे दोन्ही सामने ह्या मैदानावर झाले. तसेच २००३ मधील महिला क्रिकेट विश्व मालिकेचे हे एक महत्त्वाचे मैदान होते. दौऱ्यावर येणाऱ्या परदेशी संघांचे न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघांचे सामने येथे नित्याने होत असतात.[४]
मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, २०१४ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान २३ जानेवारी २०१४ रोजी, नेदरलँड्स आणि केन्या ह्या संघांदरम्यान खेळवण्यात आला. [५]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ हॉजसन, डेरेक. "ऑबिच्युअरी: बर्ट सटक्लिफ" (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य) - ^ "क्रिकेट लिजंड डाइज". टाईम्स ऑनलाईन (इंग्रजी भाषेत). 2014-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ बर्ट सटक्लिफ ओव्हल, लिंकन येथे खेळवले गेलेले प्रथम-श्रेणी सामने, क्रिकेट आर्काईव्ह, २१ फेब्रुवारी २००९ रोजी पाहिले
- ^ सटक्लिफ ओव्हल वरील महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, क्रिकेट आर्काईव्ह, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ बर्ट सटक्लिफ ओव्हल, क्रिकइन्फो, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.