बंगाली संगीतकाराची द्वैभाषिक गीते

हिंदी चित्रपट सृष्टीत बंगाली संगीतकारांचे योगदान अनन्य आहे. या संगीतकारांमध्ये प्रामुख्याने हेमंतकुमार, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन आणि सलील चौधरी यांचा समावेश होतो. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या संगीतकारांनी अतिशय जिव्हाळ्याने हिंदीबरोबरच आपल्या मातृभाषेतील संगीत क्षेत्रातही काम केले आहे. कित्येकदा एक चाल (धून) दोन्ही भाषांमध्ये वापरली आहे. दोन भाषांत (हिंदी आणि बंगाली) एकाच चालीवर बांधलेली काही सुंदर गाणी त्यांच्या संगीतकारासह खालीलप्रमाणे आहेत.

संगीतकार हेमंतकुमार

बंगाली गीत हिंदी गीत
ओ नोदी रे एकटी कोथाय ओ बेकरार दिल
ओलीरो कोथा शुने बोकुल न जाओ सैंया छुडाके
आमी दूर होते तोमारेई मेरी बात रही मेरे मनमें
ओ बिरोही टुकू थेके राह बनी खुद मंजिल
ओ बांशी ते डाके छुप गया कोई रे
एई रात तोमार आमार ये नयन डरे डरे
एई पोथ जोदीना शेषे इक बार जरा फिर हस के

संगीतकार सलील चौधरी

बंगाली गीत हिंदी गीत
आमाय प्रोश्न कोरे नील कहीं दूर जब दिन ढल
आमी चोलते चोलते थेमे कई बार यूंही देखा है
दुरोंतो घुरमीर छेले दिलसे दिलकी डोर बांधे
एने दे एने दे झुमका मिला है किसी का झुमका
होलुद गांधार फूल दे घडी घडी मेरा दिलधडके
जा रे जा आमार आशार बाग में कली खिली
जारे जारे उर जारे पाखी जारे जारे उड जारे पंछी
ना जेओना रोजोनी ओ सजना बरखा बहार आयी
ना मोनो लागेना ना जिया लागेना तेरे बिना
निशीदिन निशीदिन निसदिन निसदिन मेरा जुलमी सजन
ओगो आर किछु ते तस्वीर तेरी दिल में
पागोल हवा न जाने क्यो होता है यूं
फागुन के डाकलाम ये दिन क्या आये लगे फूल
प्रोजापती प्रोजापती जानेमन जानेमन तेरे दो
शुधू तोमारी जोयना मैंने तेरे लियेही सात रंगके

संगीतकार सचिन देव बर्मन


बंगाली गीत हिंदी गीत
तुमी नी आमार बोंधु रे सुन मेरे बंधू रे
रोंगीला रोंगीला रोंगीला रे आन मिलो शामसांवरे
दूर कोनो पोरोबाशे वहां कौन है तेरा मुसाफिर
आलो छाया दोला पवन दिवानी न माने
ओरुणोकांती केगो जोगी पूछो न कैसे मैंने रैन
बांशी शुने आर काज नींद चुराये चैन चुराये डाका
बोर्ने गंधे छंदे गीतीते फूलोंके रंगसे दिलकी कलमसे
घूम भुलेछी निझूम हम बेखुदी में तुम को पुकारे
के जास रे भाटी गान सुनरी पवन पवन पुरवैया
मोनो दिलोना बोंधू जाने क्या तूने कही जानेक्या
नीड हारा आज राते ये रात ये चांदनी फिर कहां
निशीते जाइयो फुलोबोने धीरेसे जाना बगियन में रे
शुनो गो दोखिनो हवा खाई है रे हमने कसम

संगीतकार राहुल देव बर्मन

बंगाली गीत हिंदी गीत
चोखे चोखे कोथा बोलो नहीं नहीं अभी नहीं
की जे भाबी एलोमेलो ये जवानी है दिवानी
मोने पोडे रुबी राय मेरी भिगीभिगीसी पलकोंपे
आज गुन गुनगुन गुंजे प्यार दिवाना होता है
बोंध दारेर ओंधकारे आपके कमरेमें कोई रहता है
आकाश केनो डाके ये शाम मस्तानी मदहोश
डेके डेके काटो कोथा दिये जलते है फूल खिलतेहै
आमी बोली तोमाय दूर दीवाना करके छोडोगे लगता
जेते जेते पाथे होलो तेरे बिना जिंदगीसे कोई
ए की होलो केनो होलो ये क्या हुआ कैसे हुआ
एक दिन पाखी उरे तुमबिन जाऊं कहां के
एकटु आरो नोय दो लफ्जों की है दिल की कहानी
जाबो की जाबोना अब जो मिले हैं तो बाहोंको
जानिना कोथाय तुमी जानेजां ढुंढता फिर रहा हूं
जाले जाई गो घर जाएगी तर जाएगी
लुकाबो प्रेम की कोरी बेचारा दिल क्या करे
रुपोशी बोलोना ओई आओना गले लगालोना
तोमाते आमाते कोथा दो नैनोंमें आंसू भरे हैं

याशिवाय वडील सचिन देव बर्मन यांच्या काही बंगाली चीजा राहुल देव बर्मन यांनी हिंदीत आणल्या आहेत त्या अशा

बंगाली गीत हिंदी गीत
हाय कीजे कोरिये जे तूने ओ रंगीले कैसा जादू
मधू ब्रिंदाबोने मीठे बोल बोले बोले पायलिया
कांन्देबोने फागुन अबकेना सावन बरसे
ना आमारे सोशी चेओना जा मुझेना अब याद आ तू

याशिवाय बंगालीत आहा ओई आंका बांका जे पोथ जाए शुदूरे हिंदीत शामल मित्रांचं आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये म्हणून आढळतं. आणि शामल मित्र यांचंच बंगाली गीत आमाय श्वप्नो तुमी ओगो चिरोदिनेर शाथी हिंदीत सारा प्यार तुम्हारा मैंने बांध लिया है आंचलमें या शब्दात भेटतं. सचिन देव बर्मन यांच्या आराधना चित्रपटातील जवळपास सर्वच गाण्यांची बंगाली रूपांतरे झालेली आहेत.

वरील सर्व गीते यू ट्यूब वर उपलब्ध आहेत.

लेखिकेने प्रत्येक बंगाली ओळीचे मराठी रूपांतर दिले तर रसिकांना छान वाटेल.