फ्रेडरिक जेमिसन
फ्रेडरिक जेमिसन (जन्म - इ.स. १९३४) हे एक अमेरिकन मार्क्सवादी टिकाकार, विचारवंत, लेखक, व प्राध्यापक आहेत. त्यांच्या कार्यात भांडवलशाहीच्या मानवी संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आहे. जेमिसन सध्या अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठात साहित्याचे प्राध्यापक आहेत. साहित्यात व इतर वैचारिक क्षेत्रात विसाव्या शतकाच्या शेवटी झालेले—ढोबळपणे पोस्टमॉडर्निझम म्हणून ओळखले जाणारे—बदल हे मुलतः भांडवलशाहीचा परिणाम आहे हा जेमिसन यांचा प्रमुख विचार आहे. त्यांच्या पोस्टमॉडर्निझम या १९९१ साली प्रकाशीत झालेल्या पुस्तकात त्यांनी हा विचार मांडला. पोस्टमॉडर्निझमखेरिज जेमिसन यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. जेमिसन यांच्या कार्याला फ्रांकफुर्टी विचारधारेत गणले जाते. आधुनिक चीनच्या साम्यवादी राजकारणावर जेमिसन यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते.