फोर्ट नेसेसिटी
फोर्ट नेसेसिटी, लुईझियाना याच्याशी गल्लत करू नका.
फोर्ट नेसेसिटी हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील एक स्थळ आहे. फियेट काउंटीमध्ये असलेल्या या ठिकाणी ३ जुलै, १७५४ रोजी ब्रिटिश सैन्य आणि फ्रेंच व स्थानिक अमेरिकन टोळ्यांमध्ये युद्ध झाले होते. यात ब्रिटिशांचा पराभव होउन त्यावेळी ब्रिटिशांचा सेनापती असलेल्या जॉर्ज वॉशिंग्टनने लुइ कुलोन डि व्हिलियर्सच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंचांना हा किल्ला सुपूर्त केला.
फोर्ट नेसेसिटी हा किल्ला नसून लाकडी फळकुटांनी वेढलेली इमारत आहे. ही जागा आता राष्ट्रीय स्मारक आहे.