फोन्सेकाचा आखात
फोन्सेकाचा आखात हा मध्य अमेरिकेजवळील प्रशांत महासागराचा एक भाग आहे. याच्या भोवती एल साल्वादोर, होन्डुरास आणि निकाराग्वा देश आहेत. २६१ किमी लांबीचा किनारा असलेल्या या आखातास १८५ किमी होन्डुरास, ४० किमी निकाराग्वा आणि २९ किमी एल साल्वादोर देशांची सीमा आहे. या तिन्ही देशांत आखातातील प्रदेश व त्यातील बेटांवरील मालकीबद्दल अनेक दशकांपासूनचे वाद आहेत. इ.स. १८४९मध्ये कॅरिबियन समुद्रापासून होन्डुरासमधून या आखातापर्यंत कालवा खोदण्यासाठीचे काम नियोजित केले गेले होते परंतु ते कधीच पूर्ण झाले नाही.