फूकेट (थाई : เทศบาลนครภูเก็ต किंवा ภูเก็ต , उच्चार [pʰūː.kèt]) थायलंड मधील फूकेट बेटावर आग्नेय दिशेला एक शहर आहे. हे शहर फूकेट प्रांताचे राजधानी शहर आहे. २०२० मध्ये या शहराची लोकसंख्या ७९,३०८ होती. यात मुईग फूकेट जिल्ह्यातील तलात याय (थाई : ตลาดใหญ่ ) आणि तलात नुअ (थाई : ตลาดเหนือ) उप-जिल्हे आहेत.

फुकेट शहर
เทศบาลนครภูเก็ต
थायलंडमधील शहर

फुकेट शहर
ध्वज
चिन्ह

गुणक: 7°53′17″N 98°23′51″E / 7.88806°N 98.39750°E / 7.88806; 98.39750

देश थायलंड ध्वज थायलंड
प्रांत फुकेट प्रांत
क्षेत्रफळ २२४ चौ. किमी (८६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७९,३०८
  - घनता ६,६०० /चौ. किमी (१७,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ७:००
phuketcity.go.th


फुकेट बँकॉकच्या ८६२ किमी (535.6 मैल) दक्षिणेस आहे.[]

इतिहास

संपादन

फूकेट हे थायलंडमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. हे शहर मलय द्वीपकल्पाच्या पश्चिमेस एक महत्त्वाचे बंदर होते जिथे प्रथम चीनी आप्रवासी आले होते.

फूकेट ओल्ड टाउन हे दहा रस्त्यांमध्ये हेरिटेज इमारतींनी भरलेले एक क्वार्टर आहे: क्लांग, फांग एनगा, रसादा, डी बुक, क्राबी, थेप कासात्री, फुकेट, याओवरात, सातुन आणि सोई राममनी. या जुन्या इमारती फुकेत शहराची पूर्वीची भरभराट दर्शवित आहेत. जेंव्हा बेटवर टिन खाण या बेटावरचा एक महत्त्वाचा उद्योग होता तेव्हा या इमारती बांधल्या गेल्या होत्या. त्यांच्या वास्तुशास्त्रीय शैलीला " चीन-पोर्तुगीज" म्हणले जाते, त्यातील वैशिष्ट्य म्हणजे एकल किंवा दोन मजली इमारत ज्याचा समोरचा भाग अरुंद असून ज्याची भरपाई खोलवर दिली जाते. फरशा, दारे, छिद्रित खिडक्या आणि अन्य तपशील सर्व एकत्रित चीनी आणि युरोपियन शैलीने प्रभावितझाले आहे.[] "फुकेट ओल्ड टाउन"चे क्षेत्रफळ २.७ कि.मी. 2 (२१० राय) आहे.

२०१९ पर्यंत ललित कला विभाग आणि फुकेट प्रांताधिकारी फुकेट ओल्ड टाऊनला जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध करण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (युनेस्को) कडे प्रस्ताव तयार करत आहेत.[]

२००४ मध्येया नागरक्षेत्राला शहराच्या दर्जावर उन्नत केले गेले.

संस्कृती

संपादन

येथील मुख्य धर्म बौद्ध धर्म आहे. शहरातील बौद्ध मंदिरे ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षक स्थळे आहेत. रस्त्यांच्या कडेला गणेश आणि ब्रह्माच्या मूर्तींचे वर्णन करणारे काही हिंदू मंदिरेही पाहिली जाऊ शकतात.

लोकसंख्याशास्त्र

संपादन

२००५ पासून, फूकेटची लोकसंख्या वाढत आहे.[]

अंदाज तारीख ३१ डिसेंबर २००५ ३१ डिसेंबर २०१० ३१ डिसेंबर २०१५ ३१ डिसेंबर २०१९
लोकसंख्या ७४,२०८ ७५,७२० ७८,४२१ ७९,३०८

चित्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Phuket". Tourism Authority of Thailand (TAT). 5 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Chino-Portugal Architecture Building". Tourism Authority of Thailand (TAT). 29 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Chuenniran, Achadtaya (21 September 2019). "Old Town Phuket earns praise". Bangkok Post. 21 September 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "THAILAND: Major Cities, Towns & Communes".

बाह्य दुवे

संपादन