सर फिरोझशाह मेहता (४ ऑगस्ट, इ.स. १८४५ - ५ नोव्हेंबर, इ.स. १९१५) हे भारतीय वकील होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक नेते असलेले मेहता मवाळ विचारसरणीचे होते आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा ब्रिटिश आधिपत्याखालीच अधिक मुभा मिळाव्यात असे त्यांचे धोरण होते.

मेहता १८९० साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.