फाहियान

(फाश्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

फाहियान हा इसवी सनाच्या पाचव्या शतकातील एक चिनी बौद्ध भिक्खू होता. त्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तत्कालीन भारताचे म्हणजेच सध्याच्या भारत, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इ. देशांचे भ्रमण केले होते. तो सम्राट चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात भारतात आला होता. फाहियान सुमारे १४-१५ वर्षे भारतात भ्रमण करत होता. फाहियान याने गांधार, कनौज, कपिलवस्तू, तक्षशिला, पेशावर, श्रावस्ती, पाटलीपुत्र, मथुरा, वैशाली, कुशीनगर इ. नगरांना भेटी दिल्या होत्या.

फाहियान

मूळ नाव फाहियान
जन्म इ.स. ३३७
षान्शी प्रांत, चीन
निर्वाण इ.स. ४२२
संप्रदाय बौद्ध
गुरू बुद्ध
भाषा चिनी