फातिमा लोधी ( २९ सप्टेंबर १९८९) या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[१] त्यांना "चॅम्पियन ऑफ डायव्हर्सिटी" म्हणून ओळखले जाते, कारण तिने 'डार्क इज डिवाइन' नावाची मोहीम सुरू केली. ही पाकिस्तानातून रंगविरोधी असलेली पहिली मोहीम आहे. तिला वुमन ऑफ एक्सलन्स आणि यंग वुमन लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[२] फातिमा लोधी या पहिल्या पाकिस्तानी आहेत ज्यांनी "रंगवादाच्या" विरोधात भूमिका घेतली आहे.[३]

फातिमा लोधी
जन्म २९ सप्टेंबर, १९८९ (1989-09-29) (वय: ३४)
कराची, पाकिस्तान
राष्ट्रीयत्व पाकिस्तानी
पेशा रंगविरोधी आणि विविधतेचे समर्थन करणारी सामाजिक कार्यकर्ती
कारकिर्दीचा काळ २००८ पासून

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण संपादन

फातिमा या माजी अखिल भारतीय क्रिकेट खेळाडू आणि कराचीचे निवडक अब्बास खान लोधी यांची नात आहे. तिचा जन्म कराचीत झाला आणि त्या इस्लामाबादमध्ये मोठ्या झाल्या.

त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण कराची येथील सेंट पॅट्रिक शाळेतून सुरू केले.[४] द सिटी स्कूलमधून हायस्कूल पूर्ण केले आणि इस्लामाबादमधील शहीद जुल्फिकार अली भुट्टो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथून आंतरराष्ट्रीय संबंधातील पदवी प्राप्त केली. फातिमा यांनी युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स कडून अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत.

सक्रिय कामे संपादन

फातिमा यांनी २००८ मध्ये सक्रिय झाल्या. त्यांनी अपंग व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि समावेशासाठी बाजु मांडायली सुरुवात केली. त्यांनी "सर्वसमावेशक आपत्ती जोखीम", "अपंगत्व समानता", "समुदाय आधारित समावेशक पुनर्वसन", "सांकेतिक भाषा" आणि "सर्वसमावेशक शिक्षण" या विषयांसह ब्रिटिश कौन्सिलच्या "सक्रिय नागरिक" कार्यशाळांसह प्रशिक्षणाची सोय केली. तसेच ज्युनियर लीडर्स कॉन्फरन्स "बाय वी कॅन एन्ड हिंसा अगेन्स्ट विमेन" ही कार्यशाळा केली. २०११ मध्ये त्यांचा रोटारॅक्टचा प्रवास सुरू झाला आणि तेव्हापासून त्यांनी तिच्या क्लबमध्ये तसेच रोटारॅक्ट जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर काम केले. त्या एक समर्पित स्वयंसेविका आहेत. त्यांनी विविध स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्थांसाठी सेवा केली आहे. एचआयव्ही/ एड्स, एसआरएचआर आणि महिलांवरील हिंसाविरोधात ॲसिड बर्न पीडितांच्या हक्कांसाठी आवाज उठवला.

लहानपणापासूनच त्या "रंगवाद"च्या विरोधात होत्या. २०१३ मध्ये तिने 'डार्क इज डिवाइन' ही रंगसंगतीविरोधी एक मोहीम सुरू केली, ज्याचा उद्देश समाजाच्या सौंदर्याच्या अवास्तव मानकांची पुन्हा व्याख्या करणे अशी होती.

फातिमा ह्या आशियातील सर्वात तरुण वाढते रंगविरोधी आणि विविधतेच्या वकील आहेत. त्या विविध, स्वतःची स्वीकृती आणि सकारात्मक शरीराची प्रतिमा या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करतात.

वक्तृत्व संपादन

फातिमा ह्या स्वतः एक प्रेरक वक्त्या आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मंचांवर त्यांचे विचार मांडले आहेत.

त्यांनी २०१४ मध्ये टेड-एक्स मध्ये भाषण दिले. स.न. २०१५ मध्ये "आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण परिषदे" मध्ये पॅनेल चर्चेचे संचालन केले.

त्यांना रंगभेदावर व्याख्यान देण्यासाठी "महिला जागरूकता सेमिनार" मध्ये आमंत्रित करण्यात आले होते.

जागतिक स्वीकृती दिनानिमित्त पीटीव्ही वल्ड द्वारे अतिथी वक्ता म्हणून आमंत्रित केले होते.

रंगवादाबद्दल बोलण्यासाठी एफएम-१०० या राष्ट्रीय रेडिओ वाहिनीने अतिथी म्हणून आमंत्रित केले होते .

ओळख, मुलाखती आणि लेख संपादन

फातिमा यांची मुलाखत घेण्यात आली आहे आणि जगभरातील विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. "डार्क इज डिवाइन" अंतर्गत तिच्या कार्याचा प्रसार करण्यात आला आहे. त्या द न्यूझ मधील ५० शक्तिशाली महिलांसाठी नामांकित व्यक्तींपैकी एक होत्या.

रोटेरियन या मासिकाने त्यांची मुलाखत घेतली,[५]

बीबीसीने त्यांची मुलाखत घेतली.

यूके-आधारित रेडिओद्वारे वुमन ऑफ द वीक आणि विशेषतः अफगाण व्हॉईस रेडिओद्वारे मुलाखत घेण्यात आली.

यूएईच्या उद्योजकाने मुलाखत घेतली.[६]

वोमेनस् व्हॉइसेस नाऊ याने मुलाखत घेतली.[७]

"ब्राउन गर्ल मॅगझिन" मध्ये "फातिमा लोधी" यांची रंगवादाशी लढण्याबद्दलची कथा होती.[८]

यांना "द न्यूझ" मध्ये वैशिष्ट्यीकृत करण्यात आले होते.[९]

डॉन वृत्तपत्रात वैशिष्ट्यीकृत करण्यात आले होते.[१०]

श्रीलंकेच्या द नेशन या वृत्तपत्रात यांचा लेख प्रकाशित झालेला होता.

अफगाण व्हॉईस रेडिओच्या वेबसाइटवर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[३]

भारताच्या मीडिया प्लॅटफॉर्म युवा की आवाज वर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[११]

हिंदुस्तान टाइम्सने यांची मुलाखत घेतली होती.[१२]

वुमेनस् ओन नियतकालिकाने मुलाखत घेतली.[१३]

भारताच्या ऑनलाइन न्यूझ पोर्टल पंजाब खबर वर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[१४]

एनआरआय न्यूझ इंडिया वर यांचा लेख प्रकाशित झालेला होता.[१५]

खबरफीड तर्फे यांची मुलाखत घेतली होती.

संदर्भ संपादन

  1. ^ "Vote for Fatima Lodhi – The News Women". Women.thenews.com.pk. Archived from the original on 2017-09-10. 2015-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ "PUAN-IWEC 2015 on Twitter". Twitter.com. 2015-05-13 रोजी पाहिले.
  3. ^ a b "AV RADIO – ARTICLES – SOCIAL – Dark is Divine". Afghanvoice.org.uk. Archived from the original on 2018-07-31. 2015-05-13 रोजी पाहिले.
  4. ^ Syed Muhammed Khurram Reaz. "St. Patrick's High School, Karachi, Pakistan". Stpats.edu.pk. 2015-05-13 रोजी पाहिले.
  5. ^ "रोटोरियन मासिक".
  6. ^ ""Fighting the Color War" – an interview with Fatima Lodhi founder of Dark is Divine By Zareen Khan – w2w Events". w2wevents.wordpress.com. 2015-05-13 रोजी पाहिले.
  7. ^ "Women's Voices Now: The WVoice". Womensvoicesnow.org. Archived from the original on 2015-04-02. 2015-05-13 रोजी पाहिले.
  8. ^ "The 'Dark is Divine' Campaign Battles Intra-Racism in the South Asian Subcontinent – Brown Girl Magazine". Brown Girl Magazine. Archived from the original on 2015-08-12. 2015-05-13 रोजी पाहिले.
  9. ^ "Searching for the 'white' path". Thenews.com.pk. Archived from the original on 2015-04-02. 2015-05-13 रोजी पाहिले.
  10. ^ "Anti-colour discrimination drive wants to change mindsets - ePaper - DAWN.COM". Dawn.com. 2015-05-13 रोजी पाहिले.
  11. ^ "Why I Started 'Dark Is Divine' To Fight Against 'Colourism' And Beauty Perceptions In Asia". Youthkiawaaz.com. 2015-05-13 रोजी पाहिले.
  12. ^ "Pakistani youths enamoured by city's food, say borders don't matter". Hindustantimes.com. Archived from the original on October 2, 2014. 2015-05-13 रोजी पाहिले.
  13. ^ "September Issue 2014 – Women's Own Magazine – Facebook". Facebook.com. 2015-05-13 रोजी पाहिले.
  14. ^ "Battling the fairness craze "Dark is Divine"". Punjabkhabar.com. Archived from the original on 2015-04-02. 2015-05-13 रोजी पाहिले.
  15. ^ ""Dark is Divine" Voice of the Victims of Colorism – NRI News 24x7". Nrinews24x7.com. Archived from the original on 2015-04-02. 2015-05-13 रोजी पाहिले.