फळ प्रक्रिया उद्योग हा फळे अधिक काळासाठी साठवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे. हा शेतीपूरक व्यवसाय आहे तसेच यासाठी मोठे कारखानेही असतात.

  • फळांचे काप सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात ठेवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते.

उदा - सुकेळी, आंबा पोळी, मनुका, सुके अंजीर, फणसपोळी इत्यादी.

  • फळांच्या गरातील किंवा रसातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी मुख्यत्वे साखरेचा उपयोग केला जातो. उदा.: जॅम, जेली, मार्मालेड, मुरंबा, स्क्वॅश, सिरप इत्यादी.
  • काही फळांच्या बाबतीत मिठाचे द्रावण वापरून पदार्थांचे आयुष्य वाढविले जाते. उदा. : कच्च्या आंब्याच्या फोडी, आवळा, आमसूल मिठाच्या द्रावणात साठवतात,
  • फळे व त्यांपासून बनविण्यात येणारे पदार्थ बाटलीमध्ये अथवा डब्यामध्ये हवाबंद करून त्यांचे पाश्‍चरीकरण केले जाते. पदार्थ : बाटलीबंद वेगवेगळ्या फळांची पेये, डबाबंद फळांच्या फोडी इत्यादी.
  • लोणच्यामध्ये मोहरी, मसाल्याचे पदार्थ, मीठ, गोडेतेल, व्हिनेगर वापरल्याने फळांचे आयुष्य वाढते.
  • तापमान कमी केल्यानेसुद्धा फळे आणि त्यांचे पदार्थ जास्त काळ टिकविण्यास मदत होते. उदा.:फ्रोझन डाळिंबाचे दाणे, फ्रोझन आमरस,मटारीच्या शेंगाचे दाणे, कमी तापमानाला ताजी फळे साठविणे.

अति शीतकरण

संपादन
  • फळांचा रस काढून तो निर्जंतुक करून उणे (-)३० डिग्री ते उणे(-) ४० डिग्री सेल्सियस तापमानाला थंड करून गोठविण्यात येतो. त्यानंतर त्याच तापमानाला साठविला जातो. यामुळे त्या रसांचा स्वाद, रंग उत्तम राहतो.व बाजारात फळांची मागणी वाढते.

पदार्थ निर्जंतुक डबाबंद करणे

संपादन
  • या पद्धतीमध्ये फळांचा रस हवेच्या कमी दाबावर व कमी तापमानावर आटविला जातो. त्यानंतर निर्जंतुक करून प्लॅस्टिक बॅग किंवा टिनाच्या डब्यामध्ये हवाबंद केला जातो. हवाबंद करण्यामुळे त्यात बाहेरील जंतूंचा शिरकाव होत नाही व तो पदार्थ टिकतो.
  • नियंत्रित कक्षामध्ये (उदाहरण - हवेतील वायूंच्या प्रमाणाचे नियंत्रण, तापमान नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण) फळांच्या आवश्‍यकतेनुसार वर दिलेल्या घटकांचे प्रमाण नियंत्रित केल्यास त्याचे आयुष्य जास्त वाढते.
  • बाजारात वेगवेगळ्या वेष्टणांचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमालानुसार करूनसुद्धा फळांचे व त्यांच्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांचे आयुष्य वाढविता येते. उदा. - आंबा पोळी, सुकेळी, केळीचे वेफर्स, फळांपासून बनविण्यात येणाऱ्या पावडरी इत्यादीना लॅमिनेटेड पाऊचमध्ये ठेवून पाऊचमधील सर्व हवा काढून त्याच्यामध्ये नायट्रोजन भरला जातो. नायट्रोजन निष्क्रिय वायू असल्यामुळे त्या पदार्थांवर कुठलीही प्रक्रिया न होता ते पदार्थ जसेच्या तसे जास्त दिवस टिकतात.

संदर्भ

संपादन