पौरुष ग्रंथीचा कर्करोग

(प्रोस्टेट कॅन्सर या पानावरून पुनर्निर्देशित)


प्रोस्टेट कर्करोग तथा प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते. वयाची पासष्टी ओलांडलेल्या दर शंभर जणांमध्ये किमान २२ जणांना प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता असते.

पौरुष ग्रंथीचा कर्करोग
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० C61
आय.सी.डी.- 185
ओ.एम.आय.एम. 176807
मेडलाइनप्ल्स 000380
इ-मेडिसिन radio/574
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D011471

प्रोस्टेट कॅन्सरसारख्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक स्तरावर सप्टेंबर हा महिना जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. जगात कर्करोगाने दगावणाऱ्या एकूण रुग्णांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर हा मृत्यूचे सहावे मोठे कारण म्हणून गणला जातो.

रोगाचे निदान

संपादन

प्रोस्टेट कर्करोगाची तपासणी डिजिटल रेक्टल परीक्षणने (डीआरई) केली जाते. ज्या पुरुषांच्या रक्तामध्ये प्रोस्टेट स्फेसिफिक ॲंटिजनचा (पीएसए) स्तर ४ ते १० दरम्यान असतो, त्यांच्यातील चारपैकी एकाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता असते. जर पीएसएचा स्तर दहापेक्षा जास्त असेल तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शंका ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणे दिसून येत नाही. परंतु, तपासणीमुळे माहिती होऊ शकते. प्रोस्टेट कॅन्सर कोणतेही नुकसान न करता शरीरात निष्क्रिय रूपाने पडून राहू शकतो. हा आजार अधिक वाढल्यानंतर ग्रस्त रुग्णांचा मूत्रप्रवाह बाधित किंवा कमजोर होतो.

संस्था

संपादन

कल्याणी समूह आणि रुबी हॉल क्‍लिनिकतर्फे प्रोटेस्ट कर्करोगावर संशोधन, निदान, उपचार आणि शिक्षणासाठी पुण्यात अत्याधुनिक "प्रोस्टेस्ट कर्करोग संस्था' स्थापन करण्यात आली आहे. भारतातील लोकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि आजारावर संशोधन करणे हा प्रोस्टेट कर्करोग संस्थेचा मुख्य उद्देश आहे