प्राणहिता चेवेल्ला उपसा सिंचन योजना

प्राणहिता चेवेल्ला उपसा सिंचन योजना ही एक उपसा सिंचन योजना आहे. त्याचा उद्देश गोदावरी नदीची उपनदी असलेल्या प्राणहिता नदीतून वहात असलेले पाणी उपयोगात आणणे असा आहे. या योजनेचा फायदा तेलंगणा राज्यास होणार आहे. प्राणहिता नदी वळविण्यासाठी तयार करण्यात येणारा बंधारा हा तेलंगणाच्या कुमारम भीम असिफाबाद जिल्ह्यात असलेल्या थम्मीदिहत्ती या गावाजवळ बांधण्यात येणार आहे. या बंधारा व त्यावरील कालवा हा एक आंतर-नदी खोरे बदली दुवा आहे. याद्वारे गोदावरी नदीतील पाणी कृष्णा नदीचे खोऱ्यात आणण्यात येणार आहे. सन २०१६ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे दरम्यान याबाबत एक करार झाला. या कराराद्वारे तेथे निर्माण होणाऱ्या जलाशयाची महत्तम पातळी ही १४८ मीटर सआसपा इतकी ठेवण्याबाबत एकवाक्यता झाली. त्या धरणाची धारणक्षमता ही १.८५ टिएमसीफू इतकी राहणार आहे. २०१६ मध्ये हा प्रकल्प दोन भागात विभागिल्या गेला.(१) प्राणहिता उपसा सिंचन योजना व (२) कालेश्वरम उपसा सिंचन योजना.

तसेच याचा उपप्रकल्प म्हणून मेडिगड्डा बंधारा हाही एक प्रकल्प आहे.