प्रयुत चान-ओ-चा
प्रयुत चान-ओ-चा (थाई: ประยุทธ์ จันทร์โอชา; रोमन लिपी: Prayut Chan-o-cha ; जन्मः २१ मार्च १९५४) हा एक निवृत्त थाई लष्करी अधिकारी व थायलंडचा विद्यमान पंतप्रधान आहे. १९७२ पासून थायलंड लष्करामध्ये कार्यरत असलेला चान-ओचा २०१० ते २०१४ दरम्यान लष्करप्रमुखाच्या पदावर होता.
प्रयुत चान-ओ-चा ประยุทธ์ จันทร์โอชา | |
थायलंडचा पंतप्रधान
| |
विद्यमान | |
पदग्रहण २२ मे २०१४ | |
राजा | भूमिबोल अदुल्यदेज |
---|---|
मागील | यिंगलक शिनावत्रा |
थायलंडचा लष्करप्रमुख
| |
कार्यकाळ १ ऑक्टोबर २०१० – ३० सप्टेंबर २०१४ | |
जन्म | २१ मार्च, १९५४ नाखोन राचासिमा, थायलंड |
राजकीय पक्ष | अपक्ष |
धर्म | थेरवाद बौद्ध धर्म |
सही |
७ मे २०१४ रोजी थायलंडची तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावत्रा हिला थायलंडच्या उच्च न्यायालयाने सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. ह्या आदेशाचा फायदा घेऊन चान-ओचाने २२ मे २०१४ रोजी शिनावत्राविरोधात लष्करी बंड पुकारले व शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक केले. चान-ओचाने स्वतःला पंतप्रधानपदावर नियुक्त केले व देशाच्या संविधानामध्ये तात्पुरते बदल करून देशाचे संपूर्ण नियंत्रण स्वतः कडे घेतले. तेव्हापासून त्याने अनेक विरोधकांना तुरूंगात डांबले असून थायलंडवर हुकुमशाही गाजवण्यास सुरुवात केली आहे.
संदर्भ
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन