डाॅ. प्रमिला जरग (माहेरच्या मोरे, २३ जानेवारी, १९४७ - ) स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचे वडील आर.बी. मोरे हे डाॅक्टर आणि डाव्या चळवळीतले नेते होते आणि आई कमलाबाई मोरे या स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. प्रमिला जरग यांनी एम.बी.बी.एस.नंतर डी.जी.ओ.ची (डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी ॲन्ड ऑब्स्टेरिक्सची) पदविका घेऊन कोल्हापूरमध्ये डाॅक्टरी केली. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच त्या सामाजिक, राजकीय क्षेत्रांत सक्रिय राहिल्या. कालांतराने त्यांनी पूर्ण वेळ सामाजिक कार्य केले.

जरग आपल्या आई कमलाबाईंनी मुलींच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या मुंबईतील माझे माहेर या संस्थेचे काम ३५हून अधिक वर्षे करीत आहेत. त्यांनी महिला आणि बालकल्याण या क्षेत्रांमध्ये त्यांनी अनेक सरकारी समित्यांवर काम केले आहे. त्यांनी महिला, मुले आणि सामाजिक प्रश्नांवर वृत्तपत्रांतून लेखनही केले आहे.

प्रमिला जरग यांनी राजाराम महाराजांच्या शिवपुत्र राजाराम हे चरित्र लिहिले आहे.

पुरस्कार संपादन

  • अकोल्याच्या 'अंकुर वाङ्‌मय'कडून 'शंकरराव सोनखासकर' ऐतिहासिक कादंबरी पुरस्कार (२०११)
  • कोल्हापूरच्या 'करवीर साहित्य परिषदे'चा ग्रंथस्पर्धा प्रथम पुरस्कार (२०११)
  • कोल्हापूरच्या 'चंद्रकुमार नलगे' सार्वजनिक ग्रंथालयाचा ग्रंथ पुरस्कार (२०११)
  • जळगावच्या 'सूर्योदय सामावेशक मंडळा'चा 'जनूभाऊ जैन' साहित्यरत्न पुरस्कार (२०११)
  • दक्षिण महाराष्ट्र सभेचा 'देवदत्त पाटील' ग्रंथ पुरस्कार (२०११)
  • मुंबईतील 'वंदना प्रकाशना'चा 'आशीर्वाद' ग्रंथ पुरस्कार (२०११)
  • संगननेरच्या संगमनेर इतिहास संशोधक मंडळाकडून कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार (२०११)
  • सांगली जिल्ह्यातील पलूस येथे भरलेल्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार