प्रतिमा जोशी
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रतिमा जोशी (२३ डिसेंबर, १९५९ ) या महाराष्ट्र टाइम्सच्या माजीपत्रकार असून, सामाजिक प्रश्नांवर सक्रिय असलेल्या मराठी कथाकार आहेत. या मुंबईत राहतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुस्तके
संपादन- अज्ञाताचा प्रवासी (अनुवादित)
- इराण जागा होतोय (अनुवादित) नोबेलविजेत्या मानव अधिकार कार्यकर्त्या शिरीन इबादी यांच्या Iran Awakening या पुस्तकाचा अनुवाद
- जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी (कथासंग्रह, संपादक प्रा.पुष्पा भावे)
- जीएल आणि तारा : धगधगता अंगार आणि रसरसता निखारा
- दण्डकारण्य (कथासंग्रह)
- शोध बाईमाणसाचा (वैचारिक)
सन्मान
संपादन- मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
- ’जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी’ या पुस्तकाला २०१० सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार
- वरुणराज भिडे मित्रमंडळाचा ’वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार’ (२०१०)
- एकता कल्चरल अकादमीचा एकता गौरव पुरस्कार (१७ जानेवारी २०१५)
- २९ सप्टेंबर २०१३ रोजी चंदगड, जि. कोल्हापूर येथे झालेल्या कष्टकरी स्त्रियांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- २२ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या घाटकोपर (मुंबई) येथल्या मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- लेखन व समाजकार्य यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे राम आपटे पुरस्कार
- दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे ‘हिरकणी’ पुरस्कार
- सातारा येथून मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
- पत्रकारितेसाठी मुंबई मराठी पत्रकार संघासह अन्य राज्यस्तरीय मान्यवर संस्थांचे राज्यपातळीवरील एकंदर नऊ पुरस्कार.
- शरीरविक्रय करणाऱ्या व्यक्ती आणि मानवी तस्करीसंबंधात अभ्यास करण्यासाठी इ. स. २०००मध्ये अमेरिकन सरकारच्या कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत तीन आठवड्यांचा अभ्यासदौरा.
सामाजिक सक्रियता
संपादन० विद्यार्थीदशेपासून म्हणजे १९७८पासून लोकशाही समाजवादी विचारांवर आधारित सामाजिक चळवळींत सक्रिय. (१९७९ ते १९८२ पूर्णवेळ कार्यकर्ता.) अनेक आंदोलनांत सक्रिय.
० देवदासी-शरीरविक्रय करणाऱ्या महिला, मुले व व्यक्तींच्यात दोन दशकांहून अधिक काळ (१९७९ ते २००३) कार्यरत. या संदर्भात मुंबईतील कामाठीपुरा विभागात शैक्षणिक, आरोग्यविषयक, कायदेशीर मदत व प्रतिबंधात्मक काम. हे काम पूर्णतया विनावेतन तसेच कोणत्याही फंडिंगशिवाय सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून चालवले. या प्रयत्नांत ९० च्या वर मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न. या प्रश्नावर काम करताना आनंदवन-वरोरा, सावली-निपाणी, देवदासी निर्मूलन परिषद-गडहिंग्लज, साने गुरुजी छात्रालय-नाशिक अशा राज्य स्तरावरील अन्य संस्था/संघटनांशी जोडून घेण्याचा प्रयत्न.
० मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून पेटलेल्या संघर्षात सवर्ण व दलित समाजात संवाद निर्माण व्हावा, कटुता राहू नये यासाठी विशेष अभियानात सहभागी. नामांतर व्हावे यासाठी ६ डिसेंबर १९७९ रोजी झालेल्या सत्याग्रहात अटक. १५ दिवसांचा पुण्यातील येरवडा तुरुंगात कारावास.
० महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान या डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील संघटनेशी संबंध. 'पुरोगामी सत्यशोधक' या त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक.
० अंधश्रद्धा निर्मूलन/दलित अत्याचार/ असंघटित कामगार/सफाई कामगार/एकल महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांशी संबंध.
० सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्र या संस्थेच्या अध्यक्ष. ‘सहयात्री’ या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेच्या निमंत्रक.
० डॉ. य. दि. फडके प्रगत संशोधन केंद्राच्या सल्लागार
० मुंबईच्या गिरणगाव विभागातील आर. एम. भट हायस्कूल या राष्ट्रीय विचारांच्या प्रगतिशील मान्यवरांनी सुरू केलेल्या शाळेच्या गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघच अध्यक्ष