डॉ. प्रकाश पवार ( जन्म - १६ जुन १९६९ ) हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख व 'यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक , राजकीय विश्लेषक आणि लेखक आहेत.

व्यक्तिगत जीवनसंपादन करा

शिक्षण आणि संशोधनसंपादन करा

प्रकाश पवार यांनी १९९२ साली पदवी (BA) १९९४ साली पदव्यूत्तर १९९६ साली एम.फील. आणि २००६ साली पी.एच.डी. प्राप्त केली.२००९ साली विद्यापीठ अनुदान आयोगाकरीता Neo Hinduism in Maharashtra या विषयावर तसेच पुणे विद्यापिठाच्या BCUD विभागाकरीता 'विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना आणि नवे राजकारण या विषयावर लघूसंशोधन प्रकल्प सादर केले.विकास अध्ययन केंद्र मुंबई या संस्थेच्या Dalit Development Index - Maharashtra (DDI) करीता संशोधन सहाय्यक म्हणून काम पाहिले.साचा:वर्षकालावधी हवा[ दुजोरा हवा]

कारकीर्दसंपादन करा

१९९४ मध्ये पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाकरीता "महाराष्ट्रातील पचांयती राज" या विषयावर सर्वेक्षण केले.१९९५,१९९६,१९९९,२००४ या वर्षात सेंटर फॉर डेव्हेलपींग सोसायटीज (CSDS) दिल्ली या संस्थेकरता निवडणूक सर्वेक्षणे केली.१९९५ साली सर्वोत्कृष्ट फिल्डवर्ककरता CSDS ने सन्मानीत केले.[ दुजोरा हवा]१९९७ साली पुणे विद्यापठाच्या राज्यशास्त्र विभागात प्रकल्प सहाय्यक हि जबाबदारी पार पाडली. १९९५ ते २०१३ या कालावधीत, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची प्रा.आर.एम. महाविद्यालय आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालय,पुणे येथे महाविद्यालयीन अध्यापन केले.त्यातील सप्टेंबर २००२ ते ऑगस्ट २००६ या कालावधीत प्रा.आर.एम. महाविद्यालयाच्या राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी हा पदभार सांभाळला.

जानेवारी २०१३ पासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

साहित्य लेखन आणि ग्रंथसंपादन करा

डॉ.प्रकाश पवार वृत्तमाध्यमातून राजकीय विश्लेषण आणि लेखन करतात.'

ग्रंथलेखन
  • समकालीन राज्यशास्त्र - राज्यशास्त्राच्या उपविद्याशाखा आणि अभ्यासपद्धती ,
  • सार्वजनिक धोरण- संकल्पना,सिद्धांत आणि भारतीय सार्वजनिक धोरणाचा आढावा'
  • महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची पुर्नरचना - मतदार संघांची पुर्नरचना
  • समकालीन राजकीय चळवळी - नवहिंदूत्व व जात संघटना
  • भारतीय राजकारण नेतृत्वाची वाटचाल

पुरस्कारसंपादन करा

समकालीन राजकीय चळवळी - नवहिंदूत्व व जात संघटना, या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, डॉ . बाबासाहेब आंबेडकर राज्य वाङ्मय पुरस्कार (२०११-१२)( विभागून ) दिला गेला.[१]

भारतीय राजकारण नेतृत्वाची वाटचाल या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, डॉ . बाबासाहेब आंबेडकर राज्य वाङ्मय पुरस्कार (२०१2-१3) दिला गेला.

भारतीय राजकारण नेतृत्वाची वाटचाल या ग्रंथास दैनिक लोकमतचा पुरस्कार मिळाला आहे. (२०१४-१५)

संदर्भसंपादन करा