प्रकाश त्रिभुवन[१] (१४ जून १९५४) हे मराठीतील लेखक, दिग्दर्शक आणि आंबेडकरवादी विचारवंत आहेत.[२] महाराष्ट्रातील " दलित साहित्यिक चळवळ" चे ते अग्रगण्य आहेत. [३] प्रकाश त्रिभुवन यांनी लिहिलेले नाटक “थांबा, रामराज्य येतेय!” दलित रंगभूमी चळवळीतील मैलाचा दगड आहे. प्रकाश त्रिभुवन यांच्या “थांबा, रामराज्य येतेय!” या नाटकाचा उल्लेख मराठी विश्वकोश खंड १५ मधील "वग" या लेखात आहे.“थांबा, रामराज्य येतेय!” ५०० वेळा विविध नाट्यगृहात सादर केले आहे. प्रसिद्ध फ्रेंच लेखक दिग्दर्शक प्रीटर ब्रूक यांनी "थांबा, रामराज्य येतेय!" चा गौरव केला आहे.[४] जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या महाराष्ट्र शासन निर्मित महाराष्ट्राच्या माहितीपटात "थांबा, रामराज्य येतेय!" चा समाविष्ट आहे. "थांबा, रामराज्य येतेय!" ला कामगार कल्याण विभाग आणि महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कृत केले गेले आहे. “थांबा, रामराज्य येतेय!” आणि "गणनायिका आम्रपाली" या नाटकांचा विविध विद्यापीठ अभ्यासक्रमात समविष्ट केलेलं आहे. [५]"थांबा, रामराज्य येतेय!" नाटकाचा हिंदीत ही अनुवाद झाला आहे. यांनी "थांबा, रामराज्य येतेय!" यात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या नामांतर लढ्याची पाश्वभूमी आहे. [६] प्रकाश त्रिभुवन हे नामांतर लढ्यात सहभागी होते तसेच दलित आंदोलनातही प्रकाश त्रिभुवन सक्रिय आहेत. अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचं अकरावं दोन दिवसीय अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ नाटककार प्रकाश त्रिभुवन यांनी भूषविले आहे. [७]

प्रकाश त्रिभुवन
जन्म नाव प्रकाश खंडेराव त्रिभुवन
जन्म जून १४, इ.स. १९५४
औरंगाबाद
शिक्षण बी.एस्सी.
बी.जे.
डी.ड्रामा.
एम.ए.
एम.फिल.
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध धम्म
कार्यक्षेत्र लेखन
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कादंबरी,कथा
चळवळ आंबेडकरवादी चळवळ, नामांतर चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती थांबा, रामराज्य येतेय!
एक होता राजा
धन नको वन हवे
अडीच फुटाचा राक्षस
सत्तेमेव जयते!
गणनायिका आम्रपाली
दिग्विजय आणि इतर एकांकिका
जातक कथा
बाळकडू
नागार्जुन
कुळंबीण
हर्ष दिग्विजय
अशोक वाजपेयी की काव्य यात्रा
मचळा
हे आंबेडकर आमचे नाहीत!
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील खंडेराव त्रिभुवन
आई अंजनाबाई त्रिभुवन
पत्नी छाया प्रकाश त्रिभुवन
अपत्ये चित्रा,आम्रपाली,पद्मपाणी,आदित्य

सुरुवातीचे जीवन व शिक्षण संपादन

प्रकाश त्रिभुवन यांचा जन्म १४ जून १९५४ रोजी कांगोणी, तालुका वैजापुर जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांचे वडील खंडेराव त्रिभुवन पोलिस कर्मचारी होते आणि नंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या वडिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनातही योगदान दिले. प्रकाश त्रिभुवन यांनी सातवी वर्गापर्यंत विविध गावातील शाळांमध्ये अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी मिलिंद बहुउद्देशीय हायस्कूल, औरंगाबादमध्ये प्रवेश घेतला जी शाळा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती . दहावीनंतर प्रकाश त्रिभुवन यांना मिलिंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळावली. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारिता पदवी , नाट्यशास्त्र पदवीका , एम.ए. आणि एम. फील. पदवी पूर्ण केली. नाटकातील पदवीकामध्ये ते प्रथम श्रेणीत प्रथम आले.त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३५ वर्ष काम केले आणि बँक ऑफ महाराष्ट्र मधील वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले

साहित्यलेखन संपादन

मिलिंद महाविद्यालयात अभ्यास करताना प्रकाश त्रिभुवन आंबेडकरी चळवळीला प्रेरित झाले. मिलिंद महाविद्यालयाने लेखक, राजकारणी, कवी, नेत्यांची निर्मिती केली आहे. प्रकाश त्रिभुवन यांची नाटक "थांबा, रामराज्य येतेय!" (१९८२), एक होता राजा (१९८३)[८], धन नको वन हवे (१९९३), अडीच फुटाचा राक्षस (२००१), गणनायिका आम्रपाली (२००५), सत्तेमेव जयते! (२०१५), दिग्विजय आणि इतर एकांकिका (२०१४), [९]कथासंग्रह जातक कथा (१९९४) आणि कादंबरी बाळकडू (२००६), नागार्जुन (२०१८) .[१०] प्रकाशित झाल्या आहेत. प्रकाश त्रिभुवन यांना लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी विविध नियतकालीकांमध्ये लेख लिहिले आणि अनुवादित केले आहे. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) साठी देखील कार्यक्रम लिहिले आहे. त्यांनी "दलित रंगभूमी " आणि "सिद्धवैभव " नियतकलिक संपादित केले आहे. २०१५ मध्ये प्रकाश त्रिभुवन यांनी "अवलोकितेश्वर प्रॉडक्शन" ही संस्था सुरू केली. प्रकाश त्रिभुवन यांनी “धन नको वन हवे” आणि “गारुड” या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे . प्रकाश त्रिभुवन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य भारतातील पहिला बौद्ध नाट्य महोत्सव औरंगाबाद येथे आयोजित केला. [११]या नाट्य महोत्सवात प्रकाश त्रिभुवन लिखित , निर्मित आणि दिग्दर्शित “गुरुदक्षिणा”, “दिग्विजय” आणि “गणनायिका आम्रपाली” या तीन नाटकांचे सादरीकरण झाले.

पुस्तके संपादन

  • थांबा, रामराज्य येतेय! (१९८२)
  • एक होता राजा (१९८३)
  • धन नको वन हवे (१९९३)
  • अडीच फुटाचा राक्षस (२००१)
  • सत्तेमेव जयते! (२०१५)
  • गणनायिका आम्रपाली (२००५)
  • दिग्विजय आणि इतर एकांकिका (२०१४)
  • जातक कथा (१९९४)
  • बाळकडू (२००६)
  • नागार्जुन (२०१८)
  • कुळंबीण (२०१९)
  • हर्ष दिग्विजय (२०२१)
  • अशोक वाजपेयी की काव्य यात्रा -एम. फील. चा शोध प्रबंध (२०२१)
  • मचळा (२०२३)
  • हे आंबेडकर आमचे नाहीत ! (२०२३)

संपादन संपादन

  • सिद्धवैभव (हिंदी)
  • दलित रंगभूमी (संपादन मंडळ)

हिंदी अनुवाद संपादन

  • थांबा, रामराज्य येतेय! - रुको रुको, रामराज्य आ रहा है! (२०११)
  • गणनायिका आम्रपाली - गणनायिका अम्बपाली (२०११)

चित्रपट संपादन

  • धन नको वन हवे (लघुपट २०१५)
  • गारुड (लघुपट २०१५)
  • लढा नामांतराचा (चित्रपट २००९)

पुरस्कार व सन्मान संपादन

प्रकाश त्रिभुवन यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.

  • कामगार कल्याण मंडळ नाट्यलेखन पुरस्कार (“थांबा, रामराज्य येतेय!”१९८०, “सत्तेमेव जयते!” १९८४)
  • महाराष्ट्र शासन , रा. ग . गडकरी नाट्यलेखन पुरस्कार (“थांबा, रामराज्य येतेय!” १८८३, “धन नको वन हवे” १९९३)
  • महाराष्ट्र शासन नाट्यदिग्दर्शन पुरस्कार (“आवर्त” १९८२)
  • रा.दा. आंबेडकर ग्रंथालय देशपांडे बालसाहित्य पुरस्कार (“धन नको वन हवे” १९९४)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचा लेखन पुरस्कार (“गणनायिका आम्रपाली” २००५)
  • अस्मितादर्श सर्वोकृष्ट वाङ्मय लेखन पुरस्कार (“सत्तेमेव जयते!” २०१६)
  • अश्वघोष नाट्यलेखन पुरस्कार (“सत्तेमेव जयते!”२०१५) [१२]
  • धम्मचक्र जागृती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सन्मानपत्र
  • कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार समिती सन्मानपत्र (“गणनायिका आम्रपाली” २००६)
  • पीपल्स एज्यूकेशन सोसायटी मुंबई सन्मानपत्र २०१८
  • बँक ऑफ महाराष्ट्र नाट्यलेखन सन्मानपत्र
  • अध्यक्ष , नाट्य विभाग समिती, मराठवाडा साहित्य परिषद २००७
  • सदस्य , मराठवाडा साहित्य परिषद
  • अध्यक्ष, दलित लेखक कलावंत मेळावा, नागपूर १९९७
  • उपाध्यक्ष अखिल भारतीय दलित नाट्य परिषद, मुंबई
  • संस्थापक, सदस्य, सचिव आणि अध्यक्ष दलित थिएटर
  • राष्ट्रीय नाट्य महोत्सव दिल्ली सहभाग १९८२
  • संगीत अकादमी महोत्सवात सहभाग १९९१
  • थिएटर अकादमी तर्फे बंगाली रंगभूमीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती १९८५

विशेष कार्य संपादन

  • विद्यापीठ नामांतर तसेच इतर सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग
  • दलित थिएटर नाट्य महोत्सव आयोजन १९८२
  • नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजन १९८३
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त, प्रकाश त्रिभुवन लिखित-दिग्दर्शित भारतातील पहिला बौद्ध नाट्य महोत्सव २०१७ मध्ये गुरुदक्षिणा, दिग्विजय, गणनायिका आम्रपाली या नाटकांचे सादरीकरण
  • अध्यक्ष, अकरावे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन(२०२३)

संदर्भ संपादन

  1. ^ "Book". www.books.google.co.in (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "लेख". www.forwardpress.in. 2017-08-15 रोजी पाहिले.
  3. ^ "लेख". www.shrisar.blogspot.com. 2015-08-05 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत" (PDF). www. natyaparishad.org. Archived from the original (PDF) on 2022-09-04. 2022-09-04 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत" (PDF). www.nagpuruniversity.org. Archived from the original (PDF) on 2013-11-02. 2012-05-05 रोजी पाहिले.
  6. ^ "लेख". www.shrisar.blogspot.com. 2015-08-05 रोजी पाहिले.
  7. ^ "बातमी". https://marathi.hindusthansamachar.i. Archived from the original on 2024-01-29. 2024-01-29 रोजी पाहिले.
  8. ^ "लेख". www.marathisrushti.com. 2012-01-06 रोजी पाहिले.
  9. ^ "लेख". www.marathisrushti.com. 2012-01-06 रोजी पाहिले.
  10. ^ "लेख". maharashtratimes.indiatimes.com. 2018-08-12 रोजी पाहिले.
  11. ^ "article". www.maharashtratimes.indiatimes.com. 2017-05-13 रोजी पाहिले.
  12. ^ "लेख". www.marathisrushti.com. 2012-01-06 रोजी पाहिले.