पोखरापूर
पोखरापूर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील गाव आहे.
?पोखरापूर, कोकरापूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
२१.६६ चौ. किमी • ४७९.३ मी |
जवळचे शहर | सोलापूर |
विभाग | पुणे |
जिल्हा | सोलापूर |
तालुका/के | मोहोळ |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर |
४,६४४ (2011) • २१४/किमी२ ९०२ ♂/♀ |
भाषा | मराठी |
वस्तीविभागणी
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९३४ कुटुंबे व एकूण ४६४४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मोहोळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २४४१ पुरुष आणि २२०३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ८९४ असून अनुसूचित जमातीचे ४८४ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६२२१७[१] आहे. या गावाचे क्षेत्रफळ २१६६ हेक्टर आहे.
शैक्षणिक सुविधा
संपादनगावात शासकीय ५ अंगणवाड्या आहेत. गावातील शासकीय शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक पर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावामध्ये १ गैरशासकीय प्रशाला आहे, तेथे माध्यमिक ते उच्च माध्यमिक (कला शाखा) पर्यंत शिक्षण मिळते.
भौगौलिक माहिती
संपादनगावापासून जवळच एक मोठा पाझर तलाव आहे. बहुतेकदा हा तलाव कोरडाच पाहायला मिळतो. मात्र गावाच्या गायरानात भरपूर पाझर तलाव आहेत.
हवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
उदरनिर्वाह
संपादनहा गाव मोहोळ या तालुक्याच्या गावापासून अगदी जवळ असल्यामुळे गावातील काही लोक पैसे कमविण्यासाठी तेथे जातात. गावातील ३०% लोक दुग्धव्यवसायापासून, ४०% लोक शेतीपासून आणि उरलेले लोक धंदा, नोकरी, रोजंदारी यातून आपला उदरनिर्वाह करतात.
प्रमुख घडामोडी व समस्या
संपादनमाळढोक अभयारण्यासाठी गावातील खासगी जमिनी आरक्षित करण्याची प्रक्रिया चालू आहे. हा या भागातील वादग्रस्त मुद्दा बनला आहे.[२]
या गावाजवळ असलेले असलेले रस्त्याचे वळण अपघातप्रवण आहे. अतिशय वर्दळ, जड वाहनांचा वेग यामुळे येथे वारंवार अपघात होत असतात.[३]
तीर्थक्षेत्रे
संपादनजगदंबा मंदिर
संपादनधनजी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html
- ^ "'माळढोक'साठी मोहोळमधील 24 हजार हेक्टर क्षेत्र आरक्षित करणार". सकाळ दैनिक. २० डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "पोखरापूरजवळ अपघातात पाच गंभीर जखमी". सकाळ दैनिक. २३ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]