पॅरासिटामॉल
पॅरासिटामॉल, ज्याला ॲसिटामिनोफेन असेही म्हणतात, हे ताप आणि सौम्य ते मध्यम वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे एक ऑलोपॅथीक औषध आहे. सामान्य ब्रँड नावांमध्ये Tylenol आणि Panadol यांचा समावेश होतो.[१]
प्रमाणित डोसमध्ये, पॅरासिटामॉल शरीराचे तापमान फक्त किंचित कमी करते; या बाबतीत ते आयबुप्रोफेनपेक्षा कमी ताकदीचे आहे आणि सामान्य तापासाठी त्याचे फायदे माफक आहेत.[२] पॅरासिटामॉल सौम्य मायग्रेनमध्ये वेदना कमी करू शकते परंतु केवळ एपिसोडिक तणावामुळे उद्भवलेल्या डोकेदुखीमध्ये हे अल्पप्रमाणात प्रभावी आहे. तथापि, एस्पिरिन/पॅरासिटामॉल/कॅफीन या रसायनाच्या संयोजनाने हे चांगले उपयुक्त ठरते, जेथे वेदना सौम्य असते आणि जेथे प्रथमोपचार म्हणून याची शिफारस केली जाते.[१] पॅरासिटामॉल शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांवर देखील प्रभावी आहे, परंतु ते आयबुप्रोफेनपेक्षा निकृष्ट आहे. निव्वळ पॅरासिटामॉल देण्यापेक्षा आयबुप्रोफेन सोबत एकत्रित देण्याने सामर्थ्य याचे वाढते. ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये वेदना कमी करणारे पॅरासिटामॉल निकृष्ठ आणि वैद्यकीयदृष्ट्या नगण्य आहे. पाठदुखी, कर्करोग वेदना आणि न्यूरोपॅथिक वेदनांमध्ये वापरण्यासाठी याचा प्रभाव अपुरा दिसून आला आहे.[३]
थोडक्यात, पॅरासिटामॉलचे सामान्य दुष्परिणाम म्हणजे मळमळ आणि ओटीपोटात दुखणे आणि त्याची सहनशीलता ibuprofen सारखीच आहे असे दिसते.[४] पॅरासिटामॉलच्या दीर्घकाळ सेवनामुळे हिमोग्लोबिनच्या पातळीत घट होऊ शकते, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव, आणि यकृताच्या कार्याच्या असामान्य चाचण्या दिसून येतात. पॅरासिटामॉलचा जास्त डोस घेतल्याने वाढीव मृत्युदर तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी ( स्ट्रोक, मायोकार्डियल इन्फेक्शन ), गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ( अल्सर, रक्तस्त्राव ) आणि मूत्रपिंडाचे प्रतिकूल परिणाम यांचा सातत्यपूर्ण संबंध आहे.[५] हे औषध उच्च रक्तदाब देखील निर्माण करू शकते.[६] गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचा दीर्घकाळ वापर करणाऱ्या स्त्रियांच्या संततीमध्ये दमा आणि विकास आणि प्रजोत्पादन विकारांची उच्च वारंवारता दिसून येते, जरी पॅरासिटामॉल हे या वाढीस नक्की कारणीभूत आहे की नाही हे अजून स्पष्ट नाही.[७] काही अभ्यासानुसार गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर यांच्यातील संबंध असल्याचे पुरावे आहेत, परंतु हे निश्चित करताना अजून पुढील संशोधन आवश्यक आहे. तथापि गरोदरपणात त्याचा वापर कमीत कमी वेळेसाठी सर्वात कमी प्रभावी डोसपर्यंत केला जातो.
प्रौढ व्यक्तीसाठी शिफारस केलेले कमाल दैनिक डोस तीन ते चार ग्रॅम आहे.[८][९] जास्त डोसमुळे यकृत निकामी होण्यासह इतर दुष्परिणाम होऊ शकतात.[१०] 'पॅरासिटामोल विषबाधा' हे पाश्चात्य देशात यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे आणि युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये बहुतेक ओव्हरडोजसाठी कारणीभूत आहे.[५]
पॅरासिटामॉल प्रथम १८७७ किंवा काहींच्या मते १८५२ मध्ये बनवण्यात आले होते.[११][१२][१३] युनायटेड स्टेट्स आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये वेदना आणि तापासाठी हे सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे एक औषध आहे.[१४] हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीत आहे.[१५] पॅरासिटामॉल हे जेनेरिक औषध म्हणून उपलब्ध आहे, त्यात टायलेनॉल आणि पॅनाडोल यासह इतर ब्रँडच्या नावांचा समावेश आहे.[१६] इस २०१९ मधील निष्कर्षानुसार, ४ दशलक्ष प्रिस्क्रिप्शन मध्ये हे अमेरिकेतील १४५वे सर्वसामान्यपणे वापरले जाणारे औषध होते.[१७][१८]
संदर्भ
संपादन- ^ a b "Acetaminophen Pathway (therapeutic doses), Pharmacokinetics". 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 January 2016 रोजी पाहिले.
- ^ Meremikwu M, Oyo-Ita A (2002). "Paracetamol for treating fever in children". Cochrane Database Syst Rev (2): CD003676. doi:10.1002/14651858.CD003676. PMC 6532671. PMID 12076499.
- ^ Warwick C (November 2008). "Paracetamol and fever management". J R Soc Promot Health. 128 (6): 320–3. doi:10.1177/1466424008092794. PMID 19058473. S2CID 25702228.
- ^ Moore RA, Moore N (July 2016). "Paracetamol and pain: the kiloton problem". Eur J Hosp Pharm. 23 (4): 187–188. doi:10.1136/ejhpharm-2016-000952. PMC 6451482. PMID 31156845.
- ^ a b "Codapane Forte Paracetamol and codeine phosphate product information" (PDF). TGA eBusiness Services. Alphapharm Pty Limited. 29 April 2013. 6 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 May 2014 रोजी पाहिले.
- ^ MacIntyre IM, Turtle EJ, Farrah TE, Graham C, Dear JW, Webb DJ (Feb 2022). "Regular Acetaminophen Use and Blood Pressure in People With Hypertension: The PATH-BP Trial". Circulation. 145 (6): 416–423. doi:10.1161/CIRCULATIONAHA.121.056015. PMC 7612370 Check
|pmc=
value (सहाय्य). PMID 35130054 Check|pmid=
value (सहाय्य). Unknown parameter|pmc-embargo-date=
ignored (सहाय्य) - ^ "Acetaminophen Use During Pregnancy". Drugs.com. 14 June 2019. 9 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "Paracetamol for adults: painkiller to treat aches, pains and fever". National Health Service. 22 August 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 August 2017 रोजी पाहिले.
- ^ "What are the recommended maximum daily dosages of acetaminophen in adults and children?". Medscape. 21 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 December 2018 रोजी पाहिले.
- ^ "Acetaminophen". The American Society of Health-System Pharmacists. 5 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 September 2016 रोजी पाहिले.
- ^ Mangus BC, Miller MG (2005). Pharmacology application in athletic training. Philadelphia, Pennsylvania: F.A. Davis. p. 39. ISBN 9780803620278. 8 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 September 2017 रोजी पाहिले.
- ^ Eyers SJ (April 2012). The effect of regular paracetamol on bronchial responsiveness and asthma control in mild to moderate asthma (Ph.D. thesis). University of Otago). 24 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 August 2021 रोजी पाहिले.
- ^ Roy J (2011). "Paracetamol - the best selling antipyretic analgesic in the world". An introduction to pharmaceutical sciences: production, chemistry, techniques and technology. Oxford: Biohealthcare. p. 270. ISBN 978-1-908818-04-1. 24 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 August 2021 रोजी पाहिले.
- ^ Aghababian RV (22 October 2010). Essentials of emergency medicine. Jones & Bartlett Publishers. p. 814. ISBN 978-1-4496-1846-9. 17 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ World Health Organization (2019). World Health Organization model list of essential medicines: 21st list 2019. Geneva: World Health Organization. hdl:10665/325771. WHO/MVP/EMP/IAU/2019.06. License: CC BY-NC-SA 3.0 IGO.
- ^ Hamilton RJ (2013). Tarascon pocket pharmacopoeia : 2013 classic shirt-pocket edition (27th ed.). Burlington, Massachusetts: Jones & Bartlett Learning. p. 12. ISBN 9781449665869. 8 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "The Top 300 of 2019". ClinCalc. 12 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Acetaminophen - Drug Usage Statistics". ClinCalc.com. 12 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 February 2021 रोजी पाहिले.