सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.

अर्धशिशी (इंग्रजी भाषा-Migraine) मेंदूच्या रासायनिक बदलामुळे मायग्रेन हा आजार होत असला तरी पर्यावरणीय व जनुकीय बदलाचा परिणामही या आजाराचा मुळाशी आहे. काही संशोधनातून हा आजार मेंदूतील सीजीआरपी या पेप्टाइडच्या कमतरतेमुळे उद्भवत असल्याचे सिद्ध झाले आहे. मेंदूतील रक्तप्रवाहात बदल झाल्याने मेंदूत काही विशिष्ट संप्रेरक वाढतात. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते. यालाच अर्धशिशीची डोकेदुखी असेही म्हणले जाते. १५ ते १६ वयोगटापासून ते ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो.[]


बदललेल्या जीनशैलीमुळे मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. सातपैकी एकाला अर्धशिशीची व्याधी जडल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

या आजारात डोके गरगरणे, चक्कर येणे, डोक्यावर घण घातले जात आहेत अशा वेदना होणे, डोक्याचा अर्धा भाग सतत दुखणे, अस्वस्थ वाटणे असे त्रास होतात. मात्र, अपुरी झोप आणि इतर कारणाने त्रास होत असेल असे समजून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे हा आजार बळावतो असे आरोग्य संघटनेने म्हणले आहे.

जगभरातील आरोग्य समस्येबाबत जागृती करण्यासाठी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जागतिक मायग्रेन सप्ताह पाळला जातो. त्यानिमित्ताने संघटनेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जागितक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजी आणि इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या सूचनेवरून मायग्रेन सप्ताह पाळण्यात येतो. जगभरात मायग्रेनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगभरात सुमारे १७ कोटी व्यक्तींना मायग्रेनचा त्रास असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराला मेंदूतील काही रासायनिक स्थित्यंतरे कारणीभूत ठरतात. महिलांमध्ये संप्रेरकांचे बदल झपाट्याने होत असतात, त्यामुळे महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.[]

इतर उपाय

संपादन
  1. जास्त प्रकाशाकडे पाहणे टाळा.
  2. संतुलित आहार घ्या.आहारात हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या यांचा समावेश करावा.जादा वेळ उपाशी राहु नका.
  3. जागरण करणे टाळा. दररोज किमान सहा तासाची झोप आवश्यक आहे.
  4. वारंवार डोकेदुखी होंत असल्यास ङोळ्याचीही तपासणी करून घ्यावी.
  5. मायग्रेन डोकेदुखीवर सतत वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
  6. पोट साफ राहिल याची काळजी घ्यावी.
  7. दिवसभरात किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.
   आहार कसा असावा...... 

१. आहार वेळेवर घ्या. २. मेंदूला साखर (ग्लुकोज) पोहोचली पाहिजे. त्यासाठी उन्हाळ्यात खाण्यामध्ये गोडाचं प्रमाण थोडं तरी असावं. ३. पाणी भरपूर प्या. ४. गोडं ताक, कोकम सरबत, आवळा सरबत यांचंही सेवन करा. ५. थंडीमध्ये भुकेचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा न्याहारी जास्त घ्या. ६. गोड जिलेबी खा. त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

संदर्भ

संपादन

पुस्तकाचे नाव-घरचा वैद्य ही योगासने करा

अर्धशिशीसाठी शशांकासन (चंद्रासन), अधोमुख श्वानासन, सुप्त भद्रासन, पाद हस्तासन, विपरीतकरणी मुद्रा, शीर्षासन, सर्वागासन (शीर्षासन करण्यास कठीण असलेल्यांना अत्यंत सुलभ असं सर्वागासन आहे.), मत्स्यासन तसेच नाडीशोधन प्राणायाम (अनुलोम विलोम), कपालभाती, भस्त्रिका, शीतली आणि शीतकारी हे प्राणायाम अत्यंत गुणकारी आहेत. मेंदूला जास्तीत जास्त रक्तपुरवठा तसेच प्राणवायू (ऑक्सिजन) या योगासनांमुळे आणि प्राणायामामुळे मिळतो. त्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते.

पण पूर्णपणे घरगुती उपायांवर अवलंबून राहणंही चुकीचं आहे. त्यासाठी जर वारंवार डोकं दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं कधीही सोयीस्कर. आपल्याला असणारी डोकेदुखी नक्की अर्धशिशीच आहे का, हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात. उन्हाळ्यात अर्धशिशीचा त्रास अधिक होतो. तेव्हा घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडा. शक्य असल्यास एखादं गोड चॉकलेट वा गोड पदार्थ जवळ ठेवा आणि आपली तब्येत सांभाळा.

  1. ^ "मेंदूतील केमिकल लोच्या!". Loksatta. 2019-09-11 रोजी पाहिले.
  2. ^ ऑनलाईन, सामना. "मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढली; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-11 रोजी पाहिले.