पूर्वा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची हावडा (पश्चिम बंगाल) आणि नवी दिल्लीच्या मध्ये दररोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन आहे.

पूर्वा हा शब्द भारताचा पूर्वेकडील भाग दर्शवितो. ही ट्रेन बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील प्रवाश्यांसाठी राजधानी नंतर सगळ्यात चांगली ट्रेन आहे.[] या ट्रेनला एल.एच.बी.चे २२ कोच देण्यात आलेले आहे जे ३० एप्रिल २०१३ पासून कार्यरत आहेत. सध्या या ट्रेनचा अधिकतम शक्य वेग १३० कि.मी. प्रतितास आहे.

१२३०३/०४ पूर्वा एक्सप्रेस ही तिच्या हावडा ते नवी दिल्ली (पाटणा मार्गे) ह्या मेन लाईन सेक्शन दरम्यान WAP-४ / WAP ७ ह्या विजेवर चालणाऱ्या एका इंजिनच्या मदतीने चालविली जाते.[] १२३०३/०४ पूर्वा एक्सप्रेस ही तिच्या हावडा ते नवी दिल्ली प्रवासादरम्यान WAP ७ ह्या विजेवर चालणाऱ्या एका इंजिनच्या मदतीने चालविली जाते.[]

सन २००० च्या सुरुवातीला या ट्रेनचा रंग फिकट तपकिरी वरून निळा करण्यात आला. सुरुवातीला या ट्रेनला संपूर्ण फर्स्ट ए.सी. कोच होते. जेव्हा ही ट्रेन सुरू झाली होती तेव्हा त्या ट्रेनला तिच्या प्रवासादरम्यान सर्वोत्तम प्राधान्य दिले जात होते. राजधानी एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर या ट्रेनला पूर्वीइतके प्राधान्य दिले जात नव्हते.

काही घटना

संपादन

१४ डिसेंबर २०१४ रोजी ८:१५ वाजता १२३८१ अप हावडा - नवी दिल्ली गाडी हावडा स्टेशन सोडल्यानंतर ८:२७ वाजता ट्रेन रुळांवरून घसरली. पूर्वा एक्सप्रेसचे ११ स्लीपर कोच आणि एक पॅन्ट्री कोच हावडा स्टेशन सोडल्यानंतर लिलूह स्टेशनजवळ रुळांवरून घसरले.[] रेल्वेच्या सूत्रांनुसार कुणीही जखमी किंवा कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. रेल्वे सूत्रांच्या म्हणण्यानुसार ट्रेनचा वेग खूप कमी होता आणि अपघातामागची कारणे ते शोधत आहेत. ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे सर्व प्रवासी बचावले. सूत्रांनुसार "पूर्वा एक्सप्रेस १० ते १५ कि.मी. प्रतितास या वेगाने धावत होती. जरी ट्रेनचा उच्चतम वेग १२० कि.मी प्रतितास असला तरी तिचा सरासरी वेग ६३ कि.मी. प्रतितास आहे. ट्रेन वेगात असतांना जर ही घटना घडली असती तर खूप मोठी आपत्ती ओढवली असती".

संदर्भ

संपादन
  1. ^ "Poorva Express Routes". 2017-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 April 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "12303/Poorva Express (via Patna)". 8 April 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Train Time Table - Poorva Express (12304)". 8 April 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "12 coaches of Howrah-New Delhi Poorva Express derail, no casualty". 8 April 2017 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन