पुरुषोत्तम देशपांडे
(पु.य. देशपांडे या पानावरून पुनर्निर्देशित)
पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (१९००-१९८६) हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणाऱ्या विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांनी एकूण ४१ पुस्तके लिहिली. तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी अतिशय मौलिक आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे.[१]
पुरुषोत्तम देशपांडे |
---|
समाजसेविका व गांधीवादी विचारवंत श्रीमती निर्मला देशपांडे यांचे ते वडील होते.
निवडक पुस्तके
संपादन- अनामिकाची चिंतनिका
- अनुभवामृत रसरहस्य : ज्ञानेश्वरकृत अमृतानुभवाचे रसग्रहणात्मक निरूपण, खंड १, २, ३.
- आमूलाग्र
- आहुती
- काळी राणी
- गांधीजीच का?
- खरा पातंजल योग (इंग्रजी अनुवाद - The authentic yoga : a fresh look at Patanjali's yoga sutras with a new translation, notes and comments) (२ इंग्लिश आणि १९ जर्मन आवृत्त्या)
- चंद्रावरचा कलंक
- Tathagata Buddha, the Untold Story of the Enlightened One (इंग्रजी)
- नवी मूल्ये
- नवे जग
- नित्यनूतन भगवद्गीता आणि जीवनदर्शन
- बंधनाच्या पलीकडे (स्वतंत्र सामाजिक कादंबरी)
- भेरीघोष की धर्मघोष?
- मयूरपंख
- मानवोपनिषद : प्राचीन ब्रह्मविद्येचे अर्वाचीन स्वरूप
- विशाल जीवन
- विश्वदर्शन अथवा नासदीय सूक्त नीराजन(?)
- सदाफुली
- सुकलेले फूल (स्वतंत्र सामाजिक कादंबरी)
- ज्ञानदेव (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८५)
पु.य. देशपांडे यांच्यासंबंधीची पुस्तके
संपादन- इलाचंद्र जोशी और पुरुषोत्तम यशवंत जोशी : मनोवैज्ञानिक उपन्यासों का तुलनात्मक अध्ययन (हिंदी, इंदू भाटिया)
- पु.य. देशपांडे (इंदुमती शेवडे)
- पु.य. देशपांडे यांचे कादंबरी विश्व (प्रज्ञा आपटे)
पुरस्कार
संपादन- 'अनामिकाची चिंतनिका'साठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९६२)
(अपूर्ण)