पुरुषार्थ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुरुषार्थ म्हणजे.... भारतीय तत्त्वज्ञान धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगते.
पुरुषार्थचा व्यावहारिक अर्थ पराक्रम. हा करायचा असतो, दाखवायचा असतो किंवा गाजवायचा असतो. पुरुष जसे पुरुषार्थ दाखवतात तसे स्त्रियांही. हा दाखवण्यासाठी जातिभेद लागत नाही.
हिंदू धर्मात मात्र पुरुषार्थाचा वेगळाच अर्थ आहे. लग्नाच्या वेळी वर वधूला वचन देतो की 'धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि। मी तुला धर्मपालनात, संपत्ती जमा करण्यात, इच्छापूर्तीत मागे टाकून पुढे जाणार नाही, तुझा कधीही विश्वासघात करणार नाही'
हिंदू धर्मात अनेक जीवने आणि अनेक जन्म असल्याचे सांगतो. यांतला प्रत्येक जन्म अद्वितीय आहे, प्रत्येक जीवनाच्या वेगवेगळ्या गरजा आहेत. यास्तव हिंदू धर्म कोणत्याही विशिष्ट जीवनाचे उद्दिष्ट नाही. त्याच्या बदल्यात हिंदू धर्म मानवी जीवनाचा अर्थ म्हणजेच पुरुषार्थ प्रदान करतो. या पुरुषार्थात चार घटक आहेत - धर्म (कर्तव्य), अर्थ (साफल्य), काम (आनंद) आणि मोक्ष (मुक्ती).
पुरुषार्थ ही कल्पना कमीतकमी पाच हजार वर्षे जुनी आहे. सुरुवाती पासून याच्यात चार घटक होते.मात्र काही बुद्धिजीवीयांनी हिंदू धर्माच्या बदनामी साठी आणि हिंदू धर्म बौद्ध धर्मातून वास्तव्यास आला हे सिद्ध करण्यासाठी धर्म, अर्थ आणि काम हे तीनच पुरुषार्थ सांगितले आहे. महाभारत रचणाऱ्या व्यासाने म्हणले आहे की, धर्माचे पालन केले की अर्थ, काम आणि मोक्ष आपोआपच प्राप्त होतात. भीष्मपर्वात व्यासाने मोक्षधर्माचा उल्लेख केला आहे.
सुरुवातीच्या हिंदू धर्मात केवळ कर्तव्याशी जोडलेल्या धर्माला महत्त्व दिले होते. पण मनुष्य स्वाभाविकरीत्या साफल्य आणि आनंदाकडे आकर्षित होतो. ह्या बाबींवर संयम राखण्यासाठी कर्तव्याशी जोडलेल्या धर्माचा उपयोग होतो. धर्माच्या सामाजिक प्रभावामुळे लोकांना योग्य काम करण्याची आणि दुसऱ्याचा विचार करण्याची बुद्धी होते. धर्म-शास्त्रे आपल्या दैनंदिन सुखी जीवनाचा त्याग करून संन्यास घ्यायला कधीच सांगत नाहीत. आपले गृहस्थ जीवन पूर्णतः संपले की मगच संन्यास घेण्याचा मार्ग उचित समजला जातो.
जेव्हा गौतम बुद्धाने जीवनाचा त्याग करावा असे सांगितले, तेव्हा मात्र लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आणि सुखी जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याचा विचार धर्मात आला. गौतम बुद्धाच्या मते धर्माचा मुख्य उद्देश म्हणजे निर्वाण (मुक्ती). कारण निर्वाणामुळेच सर्व पीडा संपतात. मात्र हिंदूंनी या कल्पनेला अधिक थारा दिला नाही.
हिंदू मंदिरे पाच हाजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. त्यांना प्रत्युत्तर म्हणून बौद्धांनी चैत्यांचे आणि विहारांचे निर्माण केले. या मंदिरांमध्ये देव-देवतांचे विवाह होत असत (हे 'धर्माचे' प्रतीक होते), लोक संपत्तीचा आणि शक्तीचा आनंद घेत असत (हे 'अर्थाचे' प्रतीक होते) आणि जेव्हा ते नौकाविहार आदी क्रीडा करीत, ते 'कामा'चे प्रतीक होते. मुक्तीची ('मोक्षाची) गोष्ट हे परमेश्वर प्राप्तीसाठी लोकांना गरजेची भासू लागली.
उपनिषदांमध्ये काही ऋषींनी वास्तविकतेच्या स्वरूपावर चिंतन केले होते, गौतम बुद्धानेही केले होते. असे असले तरी बुद्धाची निर्वाणाची कल्पना आणि हिंदू धर्मातली मोक्षाची कल्पना यांत अंतर आहे. जरी दोन्हीही जीवन-मरण चक्रातून मुक्तीची गोष्ट करतात, तरी निर्वाणात स्वतःला विसरून जाण्याची बाब आहे, तर मोक्षात स्वतःच्या आत्म्याचे परमात्म्याशी मीलन करण्याची संकल्पना आहे. हे मीलन भक्ती, कर्तव्य किंवा ज्ञानाने होते. (भक्तिमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग).
उपनिषदांमधून मिळालेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादा राजा धर्माचे केवळ पालनच करीत नाही, तर त्याचे सार समजतो. योगवासि़ष्ठाचा हाच आधार आहे. जेव्हा राम सर्वस्वाचा त्याग करून जीवन संपवायची गोष्ट करतो, तेव्हा गुरू वसिष्ठ त्याला धर्माने दिलेल्या बुद्धिमत्तेची ओळख करून देतात.
अर्थातच, मूळ हिंदू धर्मात असलेल्या मोक्षाच्या संकल्पनेचे उच्चाटन करून जीवन आनंदाने उपभोगण्याची वेळ आता परत आली आहे.
संदर्भ
संपादनप्राचीन भारतीय धर्मशास्त्राचे अभ्यासक, आख्यानकर्ता आणि लेखक देवदत्त पट्टनायक यांच्या एका लेखावरून.