पुरी (चांदवड)
पुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे.
?पुरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | चांदवड |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनशेती हा प्रमुख व्यवसाय असून जास्तीत जास्त व्यावसायिक शेतीला प्राधान्य आहे.मराठा समाज बहुसंख्य असून त्याच बरोबर वंजारी,चर्मकार,हरिजन आणि मुसलीम समाज सुद्धा गुण्यागोविंदाने राहतात.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनगावात जुने मारुती मंदिर असून,गावाच्या चावडीत प्राचीन राम मंदिर आहे.तसेच गावाबाहेर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले प्राचीन बारव आहे.सातमाळा डोंगरांगाच्या कुशीत वसलेल्या गावाला किल्ले कांचनचा पायथा जवळच आहे. लोकांच्या दुर्लक्षित वृत्तीमुळे प्राचीन व एतीहासिक बरवाची दुरवस्था झाली आहे.
नागरी सुविधा
संपादनराज्य परिवहन महामंडळाची मुक्कामी बस सेवा असुन,आठवडी बाजाराच्या दिवशी अधिकची बस सेवा केली जाते.गावात पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी सोय आहे.पण गावातील काही वस्त्यांमध्ये स्वच्छतेची कमतरता आहे.
जवळपासची गावे
संपादनशेलू,खेलदरी,शिंदे, कांनमंडळे,भुत्याने इत्यादी.