पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. गरीब रथ ह्या किफायती दरात पूर्णपणे वातानुकुलीत प्रवाससेवा पुरवणाऱ्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे पुणे रेल्वे स्थानक ते नागपूर रेल्वे स्थानक ह्यांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेसला पुणे ते नागपूर दरम्यानचे ८९० किमी अंतर पार करायला १५ तास व ४५ मिनिटे लागतात.