पुंता गोर्दा, बेलीझ

Disambig-dark.svg

पुंता गोर्दा बेलीझमधील एक शहर आहे. टोलेडो जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. याला स्थानिक लोक पीजी म्हणून ओळखतात तर गारिफुना भाषेत या शहरास पैनी असे नाव आहे.

२०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,९१० होती. पुंता गोर्दा विमानतळापासून माया आयलंड एर आणि ट्रॉपिक एर या विमानकंपन्या बेलीझ सिटी, प्लॅसेन्सियास आणि डांग्रिगाला सेवा पुरवतात.