पुंडलिक वेर्णेकर

मराठी नाट्य अभिनेते

पुंडलिक वेर्णेकर (जन्म : वेर्णे, गोवा, भारत, इ.स. १९१३; - महाड (महाराष्ट्र, १७ जानेवारी इ.स. २०१५]]) हे एक मराठी नाट्यअभिनेते होते. त्यांनी १९२४ ते १९५३ ही २९ वर्षे मराठी नाटकांतून स्त्री भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी पुरुष भूमिकाही केल्या.

वेर्णेकरांनी बालगंधर्वाच्या बरोबर अनेक नाटकांमध्ये कामे केली. महाडमधील एका प्रयोगात बालगंधर्वांच्या अनुपस्थितीत ती भूमिका पुंडलिक वेर्णेकर यांनी केली होती.

वेर्णेकर हे नृत्य करणारे त्या काळांतील पहिलेच रंगकर्मी कलाकार होते. गायक कलावंत म्हणूनही त्यांची ओळख होती. वेर्णेकरांनी शाकुंतल, एकच प्याला, मानापमान, सौभद्र अशा अनेक नाटकांमध्ये ते प्रमुख स्त्री भूमिका केल्या.

बालगंधर्वाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या वादाच्यावेळी वेर्णेकरांनी बालगंधर्वाच्या पार्थिवाला अग्नी दिला होता.

मृत्युसमयी वेर्णेकर १०२ वर्षांचे होते.

सन्मान

संपादन

पुंडलिक वेर्णेकरांच्या रंगभूमीवरील योगदानाबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेने कणकवली येथील नाट्य संमेलनात त्यांचा विशेष गौरव केला होता.

वेर्णेकरांच्या काही भूमिका आणि नाटके

संपादन
  • दयाल शेठ (नाटक - नवा खेळ)
  • माया एकवचनी (उधार उसनवार)
  • वीणा (प्रेमसंन्यास)