पी.जी. वुडहाउस

(पी.जी. वुडहाऊस या पानावरून पुनर्निर्देशित)


सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस उर्फ प्लम म्हणजेच पी. जी. वुडहाउस (जन्म : ऑक्टोबर १५ १८८१; - फेब्रुवारी १४ १९७५) हे निखळ विनोदातून वास्तवाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुणदोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील बर्टी वूस्टर आणि त्याचा हरकाम्या नोकर जीव्ह्ज़ या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.

पी. जी. वुडहाउस
वुडहाउस १९०४ मध्ये ( वय २३ वर्षे )
जन्म नाव पेल्हॅम ग्रेनव्हील वुडहाउस
टोपणनाव पी.जी. वुडहाउस, प्लम
जन्म ऑक्टोबर १५, १८८१
गुईल्डफोर्ड , सरे, इंग्लंड
मृत्यू फेब्रुवारी १४ , १९७५
साउथहॅंप्टन , न्यू यॉर्क, युनायटेड स्टेट्स
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
अमेरिकन ( १९७७ - वय ७४ )
कार्यक्षेत्र इंग्लंड
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार विनोदी कथा, नाटक आणि कादंबरी
कार्यकाळ १९०२ - १९७५

त्या काळातील इंग्लंडमधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात/कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड - या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तिगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ यांमुळेच विनोद घडतो.

सुरुवातीचा जीवनकाल

संपादन

वुडहाउस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी प्लम हे टोपण नाव दिले होते. वुडहाउस यांचे वडील हेनरी वुडहाउस हे हाँग काँग येथे न्यायाधीश होते. वुडहाउस घराणे हे जुने, सुसंस्कृत घराणे समजले जाई. या घराण्याचे नॉरर्फ्लोकमध्ये शतकापेक्षा जास्त काळ वास्तव्य होते.

वुडहाउस तीन वर्षे वयाचे असताना त्यांना इंग्लंडला माघारी पाठवण्यात आले होते, त्यांची देखरेखेसाठी एका आयाची नेमणूक करण्यात आली होती.

ब्रिटनमधील वास्तव्यानंतरचे जीवन

संपादन

प्रौढ जीवन

संपादन

लेखन शैली

संपादन

साहित्य संपदा

संपादन

अवतरणे

संपादन

महत्त्वाची पात्रे

संपादन

बर्टी वूस्टर

संपादन

जीव्ह्ज

संपादन

पी.जी. वुडहाऊस यांचा मानसपुत्र जीव्ह्‌ज याला विनोदी लेखक [वि.मा.दी.पटवर्धन्|वि.मा.दी.पटवर्धनांनी]] मराठी साहित्यात 'जीवा' या नावाने आणले आहे. 'जीते रहो जीवा', 'जीवाची मर्दुमकी' यांसारखी त्यांची पुस्तके एके काळी साहित्यात गाजली.

शिवराज गोर्ले यांनी ‘सांगकामे ओनामे’ या नावाच्या पुस्तकातून जीव्ह्ज आणि बर्टी यांच्या कथा मराठीत आणल्या आहेत. कथांमधून पूर्णपणे मराठी वातावरण आहे.

ब्लॅंडिंग्ज कॅसल येथे रहात असलेले इंग्लिश लॉर्ड. वयोवृद्ध, विसरभोळे. वैवाहिक स्थिती: विधुर, दोन मुले. सीनियर कन्झर्व्हेटिव क्लबचे सदस्य.

गॅलॅहड उर्फ गॅली

संपादन

लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे धाकटे बंधू. लौकिकदृष्ट्या वयस्कर (कथानकांमधील वय सुमारे ५० ते ६० दरम्यान), परंतु मनाने चिरतरुण. त्यांच्या चिरतारुण्याचे रहस्य त्यांच्या स्वतःच्याच मते (१) सदैव व्हिस्कीपान आणि (२) कधीही पाणी न पिणे हे आहे. वैवाहिक स्थिती: अविवाहित. (तारुण्यात रंगमंचावरील डॉली हेंडरसन नामक एका [गुलाबी रंगाच्या तंग विजारी परिधान करणाऱ्या] गायिकेवर त्यांचे प्रेम होते. गॅलॅहड यांचे आयुष्यातील हे पहिले आणि एकमेव प्रेम. सामाजिक स्तरांतील फरकांमुळे गॅलॅहड यांच्या वडिलांचा या विवाहास अर्थातच विरोध होता, आणि त्यामुळे हा विवाह होऊ नये म्हणून त्यांनी त्वरित गॅलॅहड यांची रवानगी दक्षिण आफ्रिकेस केली. पुढे डॉली हेंडरसनचा विवाह लष्करी पायदळातील एका जवानाबरोबर झाला, आणि गॅलॅहड निर्धारपूर्वक आजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर त्यांनी आपली बरीचशी कारकीर्द मद्यपानात आणि व्रात्यपणात घालवली.) पेलिकन क्लबचे सदस्य म्हणून त्यांनी भरपूर प्रवासही केलेला आहे. पालकांच्या विरोधामुळे अडलेल्या प्रेमी युगुलांना मदत करून येनकेनप्रकारेण त्यांचे विवाह यशस्वीरीत्या (पालकांच्या विरोधाच्या नाकावर टिच्चून) जमवून देणे हे आवडते कार्य. या कार्याचा लाभ त्यांच्या अनेक भाचे-भाच्यांनी, मित्रांच्या मुलांनी व खुद्द डॉली हेंडरसनची कन्या स्यू ब्राउन हिनेसुद्धा घेतला आहे.

लॉर्ड एम्ज़वर्थ यांची विधवा बहीण. किंबहुना लॉर्ड एम्ज़वर्थ यांच्या अनेक बहिणींपैकी एक. लॉर्ड एम्ज़वर्थबरोबर ब्लॅंडिंग्ज़ कॅसलमध्ये राहते आणि लॉर्ड एम्ज़वर्थवर दादागिरी करते.

लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे ज्येष्ठ चिरंजीव. यांचे लग्न झाले आहे.

लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे कनिष्ठ चिरंजीव. यांची पत्‍नी अमेरिकन असून सासरे उद्योगपती आहेत. सासऱ्यांच्या कंपनीची कुत्र्यांची बिस्किटे विकणे हा लॉर्ड एम्ज़वर्थ यांचा व्यवसाय आहे.

लॉर्ड एम्ज़वर्थ यांची पदकविजेती गलेलठ्ठ डुकरीण.

स्मिथ कथामालिका

संपादन

या पात्राचे पूर्ण नाव 'रूपर्ट स्मिथ' असे असून तो आपल्या आडनावाचे स्पेलिंग 'Psmith' असे करतो. (या स्पेलिंगमधील सुरुवातीचा 'P' हा 'सायकॉलॉजी', 'न्यूमोनिया' इ. शब्दांच्या स्पेलिंगमधील 'P' या आद्याक्षराप्रमाणे अनुच्चारित आहे). अत्यंत विक्षिप्त पात्र. आयुष्यात शक्यतो काहीही काम न करणे ही महत्त्वाकांक्षा. हा स्वतःला 'समाजवादी' म्हणवतो आणि इतर सर्वांना उगाचच 'कॉम्रेड' म्हणून संबोधतो.

स्मिथचा शाळासोबती आणि जिवलग मित्र. क्रिकेट हा याचा शाळेपासूनचा आवडता छंद. किंबहुना याचे दोन थोरले भाऊ क्रिकेट खेळाडू आहेत.

अंकल फ्रेड उर्फ फ्रेडेरिक अल्टमॉंट ट्‌विसल्टन उर्फ लॉर्ड आयकेनहॅम

संपादन

नोंदी

संपादन