पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को

पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को (रशियन: Профессиональный футбольный клуб – ЦСКА) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियन प्रीमियर लीग स्पर्धा आजवर ९ वेळा जिंकणारा हा क्लब रशियामधील सर्वात यशस्वी मानला जातो. २००५ साली सी.एस.के.ए. मॉस्कोने युएफा युरोपा लीग ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली.

सी.एस.के.ए. मॉस्को
पूर्ण नाव Профессиональный футбольный клуб – ЦСКА
टोपणनाव konee (घोडे)
स्थापना २७ ऑगस्ट १९११
मैदान अरेना खिम्की
(आसनक्षमता: १८,३६०)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ पहिला
यजमान रंग
पाहुणे रंग

इ.स. १९११ साली स्थापन झालेला सी.एस.के.ए. मॉस्को सोव्हियत संघ काळामध्ये सोव्हिएत लष्कराच्या मालकीचा होता. १९९१ नंतर त्याचे खाजगी क्लबमध्ये रूपांतर झाले.

बाह्य दुवे संपादन