पाल्क सामुद्रधुनी
पाल्कची सामुद्रधुनी (इंग्लिश: Palk Strait) अर्थात पाल्क सामुद्रधुनी ही भारताचे तमिळनाडू राज्य व श्रीलंका बेटाचा उत्तर भाग यांदरम्यान असलेली सामुद्रधुनी आहे. तिची रुंदी ५३ कि.मी. ते ८० कि.मी. असून ईशान्येकडील बंगालचा उपसागर व नैऋत्येकडील मन्नाराचे आखात यांना जोडते. इ.स. १७५५ ते इ.स. १७६३ सालांदरम्यान मद्रास प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर असलेल्या रॉबर्ट पाल्क याच्या नावावरून सामुद्रधुनीला नाव देण्यात आले.