पायरट्स ऑफ द कॅरिबियन: ॲट वर्ल्ड्स एंड

(पायरट्स ऑफ द कॅरिबियन: अ‍ॅट वर्ल्‍ड्‌स एंड या पानावरून पुनर्निर्देशित)


पायरट्स ऑफ द कॅरिबियन ऍट वल्डर्स एंड हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरिबियन या चित्रपट शृखंलेचा शेवटचा भाग आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला.

पायरट्स ऑफ द कॅरिबियन - ऍट वर्ल्ड्स एंड
दिग्दर्शन गोर वेर्बिनस्की
निर्मिती वॉल्ट डिस्ने
कथा टेड इलियॉट
प्रमुख कलाकार जॉनी डेप
ओरलॅंडो ब्लूम
कीरा नाइटली
संगीत हान्स झिमर
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २००७

कथानक

संपादन

चित्रपटाची सुरुवात होते ती कॅरिबियन अटलांटिक प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोकांची धरपकड व त्यांना लॉर्ड ब्रेकेट चाच्यांच्या गुन्ह्याखाली सामुदायिक रित्या फाशीचे आदेश देत असतो. अश्या प्रकारे अटलांटिकवर इस्ट इंडिया कंपनीचा जुलमी कारभार चालू असतो. लॉर्ड ब्रेकेटला जणू काही सर्व जग चाचेमुक्त करून संपूर्ण जगाचा समुद्री व्यापार आपल्या नियंत्रणा खाली आणायचा असते. जेम्स नॉरिंगट्नने मिळवलेले डेव्ही जोन्सचे हृदय ब्रेकेट ताब्यात घेतो. जर ब्रेकेटच्या इच्छेविरूद्ध काही केले तर ब्रेकेट ते हृदय बंद पाडून डेव्ही जोन्सला केव्हाही ठार मारु शकत असतो त्यामुळे डेव्ही जोन्सला व त्याच्या अतिशय प्रबळ फ्लाईंग डचमनला ब्रेकेटचे इच्छेवि‍रुद्ध ऐकावेच लागते. अश्या तऱ्हेने ब्रेकेट डेव्ही जोन्सला आपले बाहुले बनवतो.

जॅक स्पॅरोला क्रॅकेन ने गिळकंत केल्यामुळे जॅक डेव्ही जोन्सच्या तिजोरीत बंद होतो. त्याच्या बरोबर ब्लॅक पर्ललाही गिळकृत केल्यामुळे चाचे लोकांकडे ब्रेकेटच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ जहाज नसते त्यामुळे जॅकला व ब्लॅक पर्लला डेव्ही जोन्सच्या तिजोरीतून आणणे गरजेचे असते. त्यासाठी जगाच्या शेवटपर्यंत जाण्याची गरज असते व तिथे कसे जावे याचा नकाशा फॅंग या सिंगापूरच्या चाच्या पाशी असतो. इलिझाबेथ, बार्बोसा व विलियम हे फॅंगशी संगनमत करून नकाशा मिळवायचा प्लॅन आखतात. सिंगापूरला फॅंगशी बोलणी चालू असताना कंपनीचे सैनिक आक्रमण करतात. सर्व चाचे बार्बोसा इलिझाबेथ पळून निघतात. विलियम फॅंगशी गोंधळात बोलणी करून फॅंगचे जहाज व माणसे मिळवतो.

बार्बोसा एलिझाबेथ विल व इतर सर्व जगाच्या शेवटच्या टोकाकडे जायला निघतात. अत्यंत थंड समुद्रातील प्रचंड गुहेतून पुढे जातात. सरतेशेवटी त्यांना जगाचे शेवटचे टोक मिळते. त्याठिकाणी प्रचंड धबधबा असतो व अखंड महासागर त्या धबधब्यात कोसळत असतो. जहाज व त्यावरील सर्वजण धबधब्यात कोसळतात.

जॅक् स्पॅरो जगाच्या शेवटच्या टोकावर एका मोठ्या वाळवंटात ब्लॅक पर्लवर एकटा असतो. दीर्घ काळ एकटे राहिल्यामुळे त्याला सर्वत्र भास होण्यास सुरुवात झालेली असते. तो स्वतःच् स्वतःला आदेश देउन जहाजावरील कामे करत असतो. जॅकला आता वाळवंटातून हे जहाज समुद्रावर न्यावयाचे असते. याकामी त्याला वाळवंटातील खेकडे मदत करतात. वाळवंटातून जहाज समुद्रापर्यंत पोहोचते तोवर जहाजावरील सर्व जण समुद्र किनारी पोहोचलेले असतात परंतु धबधब्यात कोसळ्ल्याने जहाज मोडलेले असते. जॅक सर्वांना भेटतो व आपले काही निवडक आवडते लोक सोडून बाकिच्याना ब्लॅक पर्ल वर नेण्यास मनाई करतो कारण एलिझाबेथनेच जॅकला क्रॅकेनच्या दाढेत मरण्यासाठी सोडलेले असते, हे रहस्य सर्वांपुढे उघड करतो. परंतु जॅक कडे नकाशा नसल्याने सर्वांना ब्लॅकपर्लवर न्यावे लागतो. जहाज समुद्रात असले तरी ते समुद्र खरे जग नसते. आता सर्वांना ख‍ऱ्या जगात जायचे असते. परंतु कसे ते कळत नाही. एलिझाबेथला जगाच्या पलिकडच्या पाण्यात तिचे वडील भेटतात, जगापलिकडच्या पाण्यात फक्त मृत व्यक्तीच असतात व तिला चुकुन कळते की लॉर्ड ब्रेकेटने तिच्या वडिलांना ठार मारले आहे.तिचाही लॉर्ड ब्रेकेटवर राग अनावर होतो जॅक व विल तिला सावरतात.

दीर्घ काळ प्रवास करूनही खऱ्या जगात जायचा मार्ग मिळत नाही. सरतेशेवटी जॅकच नकाशामधून शोधून काढतो की खऱ्या जगात जाण्यासाठी सूर्यास्तासमयी जहाजाला उलटे करावे. त्याप्रमाणे जहाजाला हेलकावे देउन मोठ्याप्रयत्नाने जहाजाला उलटे करण्यात यश मिळवतात व सूर्यास्त झाल्य झाल्या ते खऱ्या जगात पोहोचतात. खऱ्या जगात पोहोचल्यावर पहिले सर्वांना पाणी पाहिजे असते. विल सर्वांना फेंगशी संगनमत केल्याप्रमाणे एका बेटावर घेउन जातो जिथे फेंग दबा धरून बसलेला असतो तिथे पोहोचतात जॅक व बार्बोसाला फेंगची माणसे अटक करतात.