पापम्मल
पापम्मल किंवा पाप्पम्मल (१९१४ - सप्टेंबर २७, २०२४) ह्या भारतातील तामिळनाडू राज्यातील एक महिला सेंद्रिय शेतकरी होत्या. आयुष्याच्या शेतावपर्यंत दररोज आपल्या अडीच एकर जमिनीवर काम करत असत. त्यांचा असा दावा होता की त्या शेतात नियमित काम करणाऱ्या सर्वात वयस्कर शेतकरी आहेत.[१][२][३] पापम्मल ह्या कृषी क्षेत्रातील अग्रगण्य असून तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाशी त्या संलग्न होत्या. भारत सरकारने पापम्म्ल यांना इस २०२१चा चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले.[४][५][६]
पाप्पम्मल | |
---|---|
जन्म |
१९१४ देवलापुरम, कोईम्बतूर, तामिळनाडू, |
मृत्यू |
२७ सप्टेंबर, २०२४ (वय: १०९ वर्षे) थेक्कमपट्टी, कोइंबतूर जिल्हा |
टोपणनावे | रंगम्मल |
वांशिकत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | शेतकरी |
प्रसिद्ध कामे | सेंद्रिय शेती |
राजकीय पक्ष | द्रविड मुनेत्र कळघम |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
वैयक्तिक जीवन
संपादनएम. पप्पम्मल उर्फ रंगम्मल यांचा जन्म इ.स. १९१४ मध्ये देवलापुरम गावात वेलम्मल आणि मरुथचला मुदलियार यांच्याकडे झाला. लहान वयातच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांचे आणि त्यांच्या दोन बहिणींचे पालनपोषण कोइम्बतूरच्या थेक्कमपट्टी येथे त्यांच्या आजीने केले. पप्पम्मल यांना एक दुकान वारसाहक्काने मिळाले आणि तेथे त्यांनी एक भोजनालय उघडले. या व्यवसायांतून मिळालेल्या नफ्यातून गावात त्यांनी जवळपास १० एकर जमीन विकत घेतली. कालांतराने त्यांच्याकडे यातील फक्त अडिच एक्कर जमीन शिल्लक राहिली. त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलांना देखील वाढवले.[१][७]
पाप्पम्मल पहाटे साडेपाच वाजता उठत असत आणि सकाळी सहा वाजता शेतात जात. तिथे त्या दुपारपर्यंत काम करत असत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि सक्रिय जीवनशैलीमुळे त्या शंभरी गाठून देखील निरोगी होत्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आवडते अन्न मटण बिर्याणी असून त्या जेवणासोबत वेगवेगळ्या भाज्या आणि कच्च्या हिरव्या पालेभाज्या खात असत. त्या दररोज आपले गरमागरम जेवण केळीच्या पानावर ग्रहण करत असत. त्या चहा किंवा कॉफी ऐवजी फक्त गरम पाणी पित असत.[१][८]
२७ सप्टेंबर, २०२४ रोजी, वयाच्या १०९ व्या वर्षी वृद्धापकाळाने पाप्पम्मल यांचे निधन झाले.[९]
राजकीय जीवन
संपादन1959 मध्ये त्या थेक्कमपट्टी पंचायतीच्या निवडून आलेल्या माजी वॉर्ड सदस्य होत्या. त्या करमादाई पंचायत युनियनमध्ये नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या होत्या. त्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)च्या सदस्या आणि एम. करुणानिधी यांच्या मोठ्या चाहत्या होत्या.[१][१०]
पुरस्कार
संपादनदिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी पाप्पम्मल यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.[१][३]
संदर्भ
संपादन- ^ a b c d e Arivanantham, R. (2018-09-12). "At 103, hard work is what keeps her going". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-27 रोजी पाहिले.
- ^ "Rs 2 doc, 105-year-old woman farmer among TN Padma winners". dtNext.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-26. 2021-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-27 रोजी पाहिले.
- ^ a b Derhgawen, Shubhangi (2021-01-27). "Twitter Celebrates 105-Year-Old Farmer Honoured With Padma Shri". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2021-01-27 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards 2021: The heroes of Indian agriculture". Mintlounge (इंग्रजी भाषेत). 2021-01-27. 2021-01-27 रोजी पाहिले.
- ^ "Organic farming pioneer: 105-year-old woman farmer from Coimbatore awarded Padma Shri". India Today (इंग्रजी भाषेत).
- ^ Staff Reporter (2021-01-26). "Ten from T.N. chosen for Padma Shri". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-27 रोजी पाहिले.
- ^ Singh, Ankita (2021-01-27). "Tamil Nadu: 105-Year-Old Woman Farmer From Coimbatore Awarded Padma Shri". The Logical Indian (इंग्रजी भाषेत). 2021-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-27 रोजी पाहिले.
- ^ "105-year-old organic farmer from Coimbatore is celebrating her Padma Shri award". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-01-26. 2021-01-27 रोजी पाहिले.
- ^ "Organic farmer Pappammal dies at the age of 109". The Hindu. 27 September 2024. 27 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Meet Padma Shri Rangama, 105-year-old who donned many hats". The New Indian Express. 2021-01-27 रोजी पाहिले.