पाथर्डे
पाथर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव राजापूर तालुक्यातील कोडवली, हर्डी, केळवडे या गावा दरम्यान वसले असून, मराठी ही येथील लोकांची बोली भाषा आहे.
?पाथर्डे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
मुख्यत: कुणबी बहुसंख्य असलेल्या या गावात कुणबी समाजा बरोबर ब्राम्हण, गुरव, धनगर या समाजाचे लोकही येथे गुण्या गोविंदानी राहतात
या लोकांचे मुख्य अन्न भात असून या बरोबरच वरी, बाजरी, नाचणी आणि कुळीद हेही आहारात असतात. उभय आहारी असलेल्या या लोकांत मच्ची आणि मटण ही तेवढ्याच आवडीने खाल्ले जाते
गणपती, होळी, शिमगा, नवरात्री हे या लोकांचे मुख्य सण असून या बरोबर इतरही पारंपरिक धार्मिक सण मोठया उत्साहात साजरे होतात.
भातशेती हे येथील मुख्य व्यवसाय होता, पण आता या गावातील तरुण पिढी शिक्षित होऊन मुंबई, रत्नागिरी पुणे या सारख्या शहरांत स्थलांतरित झाल्याने भातशेती ओस पडली आणि त्या जागी हापूस काजू या सारखी पिके दिसू लागली आहेत.धान
धांगट वाडी, भरडवाडी, निवयवाडी, किंजलवाडी, आगरवाडी आणि धनगरवाडा अशा सहा वाड्यात हे गाव विभागले आहे. दुर्गादेवी, ब्राह्मण देव आणि बालेश्वर ही गावाची प्रमुख देव स्था ने असून पारंपरिक कुलाचार प्रमाणे येथे देवाचे उत्सव आणी पूजा होतात.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनगावात शिमगा आणि नवरात्री हा प्रमुख सण सर्व गावामार्फत साजरा केला जातो तर दिवाळी गणपती या सारखे सण ग्राम वासियां मार्फत मोठया उत्साहात साजरे होतात
प्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनपाथर्डे गावात जिल्हा परिषद मार्फत पूर्ण प्राथमिक शाळा असून सदर शाळा तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून सन्मानित आहे.
गावात परिवहन मंडळातर्फे ST सेवा चालू असून यांच्या नियमित बस चालू आहेत.
गावात दवाखाना नाहीय, किरकोळ दुकानें आणि काही काजू फॅक्टरी आहेत.
महाराष्ट्र विधुत वितरण ची वीज पुरवली जाते.
जवळपासची गावे
संपादनहर्डी
कोदवली
केळवडे
पेंडखले
भू
तेरवण
खरवते
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/