पाणडुबी
पाणडुबी, लांडे बदक, पाणकोंबडी तथा टिबुकली (शास्त्रीय नाव: टॅकिबॅप्टस रुफिकॉलिस) हा बदकासारखा दिसणारा पाणपक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये लिटल ग्रेड किंवा डॅबचिक असे नाव आहे.
माहिती
संपादनसाधारण २३ सेमी आकाराचा पाणपक्षी सहसा गावतळी नद्या आणि जलाशयांवर दिसतो. धोका दिसल्यास पाणडुबी पाण्यात बुडी मारते आणि पाण्याखालून पोहत जाते. पाणकिडे, बेडूक, खेकडे, झिंगे हे या पक्ष्यांच्या मुख्य अन्न असते. जोडी जोडीने किवा छोट्या थव्यामध्ये राहणाऱ्या या पक्ष्याचे जीवन पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. पुरामुळे किवा पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे पक्षी जवळपास स्थलांतर करतात. विणीचा हंगाम पावसावर आणि पाण्याच्या पातळीवर अवलबून असतो. विणीच्या हंगामात म्हणजे साधारण एप्रिल ते ऑक्टोबर या काळात पाणडूबीची डोक आणि मानेवरची पिसे गडद तपकिरी होतात. पाणडुबीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडल्यावर चोवीस तासात पोहू लागतात आणि स्वतःच खाद्य शोधू लागतात. या पक्ष्यांच्या पायांना कातडीची झालर असते म्हणून त्यांना पाण्यात सराइतपणे पोहता येते. बदकाप्रमाणे त्याच्या पायांना पडदे नसतात. या पक्ष्याच घरटे म्हणजे पाणवनस्पतीचा तरंगणारा ढिगारा असतो. घरट्यात अंडी असताना घरटे सोडून जाताना हा पक्षी आपली अंडी पाणवनस्पतीच्या पानांनी झाकून टाकतो. याच्या पोटावरील पिसे पांढरट आणि रेशमासारखी मऊ असतात. पाणडुबी आपलीच पिसे स्वतः खातो आणि पिल्लांनाही भरवतो.
संदर्भ
संपादन- दोस्ती करू या पक्ष्यांशी-श्री किरण पुरंदरे