पाटेठाण
पाटेठाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील शिरूर हवेली आणि दौंड तालुक्याच्या सीमेवरील हे एक गाव आहे. पाटेठाण हे गाव लोकवस्ती आणि क्षेत्रफळाने लहान असल तरी गावाची रचना,गावातील पांढरी (जुन्या वस्तीतील) मध्ये असलेली वाड्याची 10-12फूट उंचीची जोती,गावाच्या जुन्या अवशेषांचे पांढऱ्या मातीतील ढीग,नदीतीरावरील पुरातन यादवीस्थापत्यशैलीचे महादेव मंदिर,त्यासमोरील चुन्याची जाती आणि गाड्याची चाक तसेच मंदिरासमोरील विरगळी हे गावातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तू पाहून गावाला इतिहासात नक्कीच महत्त्वाचं स्थान असेल हे जाणवते पण तसा उल्लेख व पुरावे असल्याशिवाय त्या वस्तुंना व वास्तूंना मान्यता देता येत नाही.ह्या गोष्ठीचा शोध घेत मंगेश गणेश गावडे यांनी गावाचे इतिहासात असलेले उल्लेख शोधण्यात यश मिळवले. शके 1699 साली जेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांची सत्ता महाराष्ट्र भर होती तेव्हा त्यांनी पाटेठाण ता.सांडस प्रांत पुणे हा गाव रामचंद्र नारायण यांच्याकडे होता तो राजश्री निळकंठ गोविंद गोसावी यांच्या ताब्यात दिला होता.तशा आशयाच पत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे प्रधान माधवराव नारायण यांच्या शिक्कानिशी आढळून आलं आहे. श्रीमंत रायरीकर खाजगीवाले यांच्या पत्रव्यवहारांच्या मोडी कागडपत्रानुसार निळकंठ गोसावी यांनी 17व्या शतकाच्या सुमारास पाटेठाण गावच पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर जे जीर्ण होत त्याचा जिर्णोद्दार करून सरकारी शिबंधी साठी एक वाडा आणि पागा बांधल्याचा उल्लेख आढळून आला आहे. पुढं 1704 मध्ये तुकोजी होळकर यांनीं नीलकंठ गोसावी यांना पत्र पाठवून पाटेठाण गावात व परिसरात जो जकात,धान्य आणि वैरण गोळा केली होती ती त्या काळी असलेल्या मनाचीटी गावात पोहचविण्याची सोय करावी आणि पाटेठाण गावाला कसलाच उपसर्ग म्हणजे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी ताकीद दिल्याचं एक पत्र सुद्धा मोडीमध्ये आढळून आलं आहे. जेष्ठ इतिहास तज्ञ राजवाडे यांनी ह्या पत्राची लिप्यांतर करून ठेवली आहेत.भारतीय पुरातन इतिहास मंडळ येथे ही पत्रे पहायला मिळतात.नुकतंच मंगेश गावडे नावाच्या तरुणांन हे शोधून काढले. याशिवाय पाटेठाण गावात यादवकालीन विरगळी,चुन्याचा घाना,मंदिर पाहायला मिळत.सद्गुगुरू समर्थ हंबीरबाबा नावाचे महान संत या गावात जन्माला आले त्यांनी जगाला मानवता शिकवत ध्यान,धारणा,साधना आणि नामस्मरण याच्या माद्यमातून अध्यात्माची ओळख निर्माण करून दिली.
?पाटेठाण महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दौंड |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनपाटेठाण गावात सर्व जाती धर्माची लोक राहतात.सगळे एकमेकांशी प्रेमपूर्व संबन्ध ठेवून आहेत.साधं स्वच्छ आणि शेतकरी असल्याने त्याबपद्धतीच लोकजीवन पहायला मिळत.गावची पाटीलकी पूर्वी हंबीर नंतर गावडे आणि आता पुन्हा हंबीर आडनावाच्या लोकांकडे आहे.शेती का प्रमुख व्यवसाय असल्याने लोकांचं जीवन एकमेकांवर अवलंबून आहे
प्रेक्षणीय स्थळे
संपादन1)नागेश्वर महादेव मंदिर-पाटेठाण गावाच्या लागत असलेल्या भीमा नदीतीरावर एक प्राचीन यादवकाळी बांधलेलं महादेवाचं सुबक अस महादेव मंदिर आहे.या मंदिराचा जिर्णोद्दर राजाराम महाराज यांच्या काळात निळकंठ गोसावी नावाच्या व्यक्तींन केला होता.सोबत एक वाडा आणि घोड्याची पागा बांधली होती.गावातील सर्वात प्रसन्न वाटणारी ही जागा आहे.शिवाय मंदिरासोबत विरगळी,जुन्या वास्तू, दीपमाळ आणि इतर मंदिरे पण पाहण्यासारखी आहेत.
2)भीमा नदी- गावाला लाभलेलं विशाल भीमा नदीपात्र आणि त्यावरील बंधारा हे गावाचं वैभव आहे.भर पावसाळ्यात तर नदी भरलेली असते तेव्हा बंधाऱ्यावरून गाव खूप छान दिसतो.
3) रांजण खळगे पाटेठाण गावातील रांजण खळगे
आकाराने व संख्येने कमी रांजण खळगे महाराष्ट्रात भीमा नदीच्या प्रवाहात पाटेठाण गावाच्या हद्दीत दिसून येतात. दौंड तालुक्यात राहू-वाघोली मार्गावर पाटेठाण गाव आहे,गावात यायला गावाच्या चारही बाजूने वेगवेगळे रस्ते आहेत. पाटेठाण गावाच्या ईशान्य दिशेला नदीचा जो प्रवाह आहे त्या परिसरात शेकडो एकर जमीन व नदीपात्र मजबुत खडकाने व्यापलेला आहे आणि म्हणून या परिसराला स्थानिक शेतकरी खडकाळ नावाने ओळखतात. भीमा नदीच्या प्रवाहाने हे खडक कापत या ठिकाणी निसर्गाचा एक चमत्कार घडवून आणलाय ती म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे शेकडो रांजण खळगे. या रांजण खळग्या पर्यंत येण्यासाठी गावाच्या बाहेरून शेतात जाण्यासाठी जो कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने किंवा नदीच्या बंधाऱ्यावरून जंगलातून एक रस्ता या ठिकाणी जातो पण जंगलातला रास्ता फारसा कोणाला माहीत नाही,चुकमुक होऊ शकते.
नागरी सुविधा
संपादनपूर्वी या गावात काहीच न्हवत,एक रात्री कधीतरी एखादी महामंडलाची बस यायची पण आता या गावाच्या जवळ राहू रोड ने दर 15 मिनिटाला पुणे शहराला जोडणारी बस असते.गावात आता बँक,शाळा,सर्व प्रकारची दुकान,हॉस्पिटल उपलब्द आहे.त्यामुळे सर्व प्रकारच्या नागरी सेवा मिळतात.गावात सुसज्ज शाळा,वाचनालय आहे.
जवळपासची गावे
संपादनपाटेठाणच्या पूर्वेला वाळकी,राहू,वडगाव बांडे ही गाव आहेत.पश्चिमेला सांगवी सांडस,न्हावी सांडस, दक्षिणेला देवकरवाडी,दहिटने तर उत्तरेला टाकळी भीमा,निमगाव अशी गावे आहेत