पाटस हे गाव पुणे सोलापूर हायवे वर आहे .या गावात भीमा सहकारी साखर कारखाना आहे .तसेच भीमा शैक्षणिक न्यासचे सुभाषअण्णा कूल शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सुभाषआण्णा कूल अध्यापक विद्यालय आहे .तसेच आ. टी .आय .आहे गावात रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर हायस्कूल व ज्युनियर कोलेज आहे. जिल्हा परिषदची केंद्र शाळा आहे.गावात एस टी स्टॅड आहे जवळच रेल्वे स्टेशन आहे . आठवडी बाजार सोमवारी भरतो .पाटस येथे मस्तानी तलाव आहे व हा दगडी बांधकामात असून अत्यंत सुंदर असा नजरा पावसाळ्यात आपणास पहावयास मिळतो या तळ्यात पंढरी व जांभळी कमळ फुले पहावयास मिळतात.पाटस या गावात आरोग्य केंद्र आहे.