पांथस्थचे झाड

वनस्पतीच्या प्रजाती

पांथस्थ (Ravenala madagascariensis) हे एक केळीच्या कुळाशी जवळचा संबंध असलेले झाड आहे. परंतु याचे खोड केळीप्रमाणे नसून ताड-माडाच्या झाडाप्रमाणे खडबडीत असते. पांथस्थच्या झाडाचे मूळ जन्मस्थान मादागास्कर असून याची केळीच्या पानांसारखी पाने पंख्याच्या आकारात रचल्यासारखी दिसतात. प्रत्येक पानाला लांबलचक देठ असतो. ४० फूट उंच वाढू शकणाऱ्या या झाडाला एकेका दांड्यावर होडीच्या आकाराची फुले येतात. दोन पानांमधून वाट काढत हा फुलोरा येतो. फुलांतील बिया निळसर आणि सहज रुजून येणाऱ्या असतात.

Ravenala madagascariensis 002

पांथस्थच्या डौलदार आकारामुळे हे झाड अनेक उद्योग समूहांच्या उद्यानांत लावलेले दिसते.

संदर्भ संपादन

मुंबईची वृक्षराजी (पुस्तक, लेखिका - मुग्धा कर्णिक)