पांढऱ्या गळ्याची भू कस्तुरिका
पांढऱ्या गळ्याची भू कस्तुरिका, लंगली, हरदुली किंवा पानपतारा गुळफा (इंग्लिश:whitethroted ground thrush) हा एक पक्षी आहे.
ओळखण
संपादनपांढऱ्या गळ्याची भू कास्तुरिका हा पक्षी आकाराने मैनेपेक्षा लहान, गळा व कानाभोवतालचा रंग पांढुरका असतो त्यावर गर्द तपकिरी रंगाच्या दोन पट्ट्या, खांद्यावर पांढरा पट्टा पंखाची किनार पांढुरखी असते. डोक्याचा काळा पांढरा रंग छान उठून दिसतो.
वितरण
संपादननिवासी, स्थानिक स्तलांतर करणारे, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र तामिळनाडू, कर्नाटक व केरळ येथे विलीन असतात .
निवासस्थाने
संपादनवने, दर्या , व नाल्याकाठची झाडे ,जंगले, कॉफीच्या लागवडीचा प्रदेश आणि बांबूमिश्रीत वने येथे आढळून येतात.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली