पांडुरंग पुंडलिक फुंडकर

भारतीय राजकारणी
(पांडुरंग फुंडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

पांडुरंग पुंडलिक तथा भाऊसाहेब फुंडकर (२१ ऑगस्ट, १९५०:खामगांव - ३१ मे, २०१८:मुंबई) हे भारतीय राजकारणी होते. शांत संयमी अशी प्रतिमा जपत त्यांनी संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते भाजपा असा प्रवास केला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानांच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सक्रिय झाले होते. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री होते.

यांचा मुलगा आकाश पांडुरंग फुंडकर महाराष्ट्राच्या १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडुन गेला.[ संदर्भ हवा ]

1989 ते 1998 या कालावधी मध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून खासदार होऊन काँग्रेस च्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात त्यांना यश आले. आणि याच काळात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या दिग्गज नेत्यांशी संपर्क वाढला. 11 एप्रिल 2005 ला विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. तसेच 25 एप्रिल 2008 रोजी दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.[ संदर्भ हवा ]

जून 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन 2006-2007 या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.[ संदर्भ हवा ]

हेही पाहा

संपादन