पर्यावरण साहित्य संमेलन
- जळगाव येथे १० डिसेंबर २०१७ रोजी पर्यावरण साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष वीणा गवाणकर होत्या.. या संमेलनाचे आयोजन समर्थन संस्था संचालित पर्यावरण शाळा यांच्या वतीने आणि जैन उद्योग समूह आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने झाले. या पर्यावरण साहित्य संमेलनाचा समारोप प्र.के. घाणेकर यांनी केला.
- मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातले ११ सप्टेंबर २०१७ रोजी चालू असलेले पर्यावरण संमेलन गुंडाळले.
- १३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स.प.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे संमेलन शनिवार दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे पार पडले. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा होत्या.
पहा : * पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन