पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे.

हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर व बिया औषधी असतात.

कच्ची पपई
पपई

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कूळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.

पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. पचनशक्ती वाढते. भूक वाढते. मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

आपल्या रोजच्या आहारात सलादमध्ये पपई, काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर यांचा समावेश असवा. आदी फळे भाज्या नियमित खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहून सौंदर्य खुलत असते.

धूळ व धूरामुळे आपल्या चेहऱ्यावर काळे दाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते. आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर भाजी व सॅलडमार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक,वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते.


पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते. पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय विकारामध्ये उपयोगी असतो. दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते. तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते. कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदाररोग व हृदयरोग यावर पपइचे सेवन करणे हितावह ठरते. पपइच्या रसामुळे अरुची दूर होते. आतड्यामध्ये पडून राहिलेल्या अन्नाचा नाश होतो. डोकेदुखी(अजीर्णामुळे) दूर होते. तसेच आंबट ढेकर येण बंद होते. खरुज व गजकर्ण यांवर पपइचा चीक लावल्यास फायदा होते. कच्चा पपईचा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात. पपई पांढऱ्या पेशींची वाढ करणारी आहे. गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो.

पपई हे पित्तनाशक फळ आहे. ज्या लोकांना कायम पित्त होते अश्या लोकांनी पपई खाण्याचे फायदे असे कि त्यांचे पित्त कमी होते आणि पित्ताचा त्रास होत नाही. पपई खाल्याने यकृताला आलेली कमजोरी कमी होते. पपई मुळे यकृताला ताकद येते आणि यकृत मजबूत बनते. पपई हे जंतुनाशक फळ आहे. पोटात जर जंत झालेले असतील तर पपई खा, पोटातील जंत नष्ट होतील.https://www.shaikhdoctor.com/2022/02/Papai-khanyache-fayde.html