बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि []; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते[]. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.:

, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलकसंकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.:

सर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सरलीकृत रूप मानता येईल. उदाहरणार्थ :

रेषीय पदावली: .

द्विघात पदावली: .

गुणोत्तरीय पदावली: .

गणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ :

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. ११०.